निवृत्तीचे वय ६० वर्षे? मुख्यमंत्री अनुकूल, महासंघाचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2023 06:29 AM2023-04-07T06:29:40+5:302023-04-07T06:30:13+5:30
राजपत्रित अधिकारी महासंघाची इतर मुद्द्यांवरही झाली चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुकूलता दर्शविली आहे, अशी माहिती राजपत्रित अधिकारी महासंघाने दिली आहे. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. त्यासंदर्भात महासंघाने म्हटले आहे की, सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणे ६० वर्षे करण्याबाबत आम्ही अभ्यासपूर्ण भूमिका मांडली, त्याबाबत प्राधान्याने कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले.
बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, महासंघाचे नेते ग. दि. कुलथे; अध्यक्ष विनोद देसाई, आदी उपस्थित होते.
या मुद्द्यांवरही चर्चा
महसूल विभागीय संवर्ग वाटपाच्या अधिनियमातून पदोन्नत अधिकाऱ्यांना वगळणे; सेवानिवृत्ती उपदानाची मर्यादा केंद्राप्रमाणे २० लाख रुपये करणे आदी मागण्यांबाबतदेखील सकारात्मक चर्चा झाली.