VIDEO: मुख्यमंत्री शिंदेंनी वारकऱ्यांचंही मन जिंकलं! अपघातग्रस्त वारकरी बांधवाना केला व्हिडिओ कॉल अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 03:38 PM2022-07-07T15:38:14+5:302022-07-07T15:40:05+5:30

शिंदे यांनी आपल्या व्यग्र कामाकाजातून वेळ काढून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अपघातग्रस्त वारकरी बांधवांची विचारपूस केली. 

Chief Minister eknath Shinde Video call to injured Warkari in pandharpur ashadhi ekadashi wari | VIDEO: मुख्यमंत्री शिंदेंनी वारकऱ्यांचंही मन जिंकलं! अपघातग्रस्त वारकरी बांधवाना केला व्हिडिओ कॉल अन्...

VIDEO: मुख्यमंत्री शिंदेंनी वारकऱ्यांचंही मन जिंकलं! अपघातग्रस्त वारकरी बांधवाना केला व्हिडिओ कॉल अन्...

googlenewsNext

मुंबई-

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे कामाला लागले आहेत. त्यांनी आज मंत्रालयात अधिकृतरित्या मुख्यमंत्री कार्यालयात उपस्थित राहून पदभार स्वीकारला असला तरी ज्या दिवशी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याच दिवसापासून शिंदे कामाला लागल्याचं पाहायला मिळालं. सांगली येथील रस्ते अपघातात पंढरीच्या वारीला जाणारे काही वारकरी जखमी झाल्याची माहिती कळताच स्वत: मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना फोन करुन अपघातग्रस्त वारकऱ्यांवर तातडीनं उपचार करुन त्यांना जी काही मदत लागेल ती करण्याचं आश्वासन दिलं होतं. तसंच गरज पडल्यास त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. आज शिंदे यांनी आपल्या व्यग्र कामाकाजातून वेळ काढून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अपघातग्रस्त वारकरी बांधवांची विचारपूस केली. 

जखमी वारकऱ्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची विचारपूस करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील विटा येथी आमदार अनिल बाबर रुग्णालयात पोहोचले होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हिडिओ कॉल लावून अपघातग्रस्तांशी संवाद साधून दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जखमी वारकऱ्यांची आपुलकीचं विचारपूस केली आणि तब्येतीची विचारणा केली. 

 

व्हिडिओ कॉलमध्ये काय म्हणाले मुख्यमंत्री?
"तब्येत कशीय तुमची? डॉक्टरांशी बोललो आहे मी त्यांच्याशी बोलणं झालंय ते सारं पाहतील. तुम्ही काळजी घ्या. आता कसंय बरं वाटतंय ना? बरं वाटेल तुम्हाला काळजी करू नका. जी काही लागेल ती व्यवस्था डॉक्टरांना करायला सांगितली आहे", असा आधार एकनाथ शिंदे अपघातग्रस्त वारकऱ्याला दिला. 

मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना केल्या होत्या सूचना
मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शवली आहे. याबाबत त्यांनी स्वत: रुग्णालयातील डॉक्टरांशी फोनवरुन संवाद साधला होता. मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी फाट्याजवळ आज एक भीषण अपघात घडला. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पीक अप जीप घुसून झालेल्या या अपघातात 14 वारकरी जखमी झाले. जखमींना तातडीने मिरज सिव्हिल आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मिरजेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांना फोन लावून या वारकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यासोबत त्यांना लागतील ते सर्व उपचार करावेत. वेळ पडल्यास त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करावे त्यांच्यावरील उपचारात कोणतीही कसूर ठेवू नका असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी लागेल तो खर्च उचलण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली. 

Web Title: Chief Minister eknath Shinde Video call to injured Warkari in pandharpur ashadhi ekadashi wari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.