...आता बोलणारे तेव्हा काय करत होते?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 09:40 AM2022-09-22T09:40:57+5:302022-09-22T09:41:14+5:30

गेल्या अडीच वर्षात कुणाच्या दादागिरीमुळे, त्रासामुळे, मानसिक छळामुळे किती उद्योग भरडले गेले, बाहेर गेले याचा हिशोब आमच्याकडे आहे असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं. 

Chief Minister Eknath Shinde's attack on Shivsena Uddhav Thackeray | ...आता बोलणारे तेव्हा काय करत होते?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

...आता बोलणारे तेव्हा काय करत होते?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Next

नवी दिल्ली - मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला तेव्हा आता बोलणारे काय करत होते? मराठी टक्का कुणामुळे कमी झाला? मराठी माणसाला बदलापूर, ठाणे, अंबरनाथ, वसई विरारला जायला भाग पाडलं त्याला जबाबदार कोण? फक्त मराठी माणसाच्या नावावर राजकारण करायचं. त्यामुळे आगामी निवडणुकीत मुंबईकर जनता यांना धडा शिकवतील असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या २५ वर्षात मुंबईकरांना काय त्रास सहन करावा हे सगळ्यांना माहिती आहे. जनतेच्या हातात सगळं काही आहे. कुणाला हरवायचं कुणाला जिंकवायचं हे लोकांना माहिती आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर शहरातील खड्डे समस्या दूर करण्यासाठी आयुक्तांची बैठक घेतली. साडे पाच हजार कोटींचे टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली. आरोग्य केंद्र, सुशोभिकरण ही कामे मार्गी लावली जात आहे. त्यामुळे निवडणुकीत जनता योग्य त्याला मतदान करेल असा विश्वास आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच आमचं सरकार येऊन २ महिने झाले. गेल्या २ वर्षापासून वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात करण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु तत्कालीन सरकारने सकारात्मक पुढाकार घेतला नाही. परंतु आमच्या सरकारनं प्रयत्न केल्यामुळे सलग्न प्रकल्प महाराष्ट्रात उभारणार असल्याचं वेदांताने जाहीर केले. गेल्या अडीच वर्षात कुणाच्या दादागिरीमुळे, त्रासामुळे, मानसिक छळामुळे किती उद्योग भरडले गेले, बाहेर गेले याचा हिशोब आमच्याकडे आहे असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं. 

त्यांच्या खोक्याचा हिशोब माझ्याकडे 
सूड भावनेने, आकसापोटी उद्धव ठाकरे टीका करत आहेत. आज देश महासत्तेकडे चालला आहे. त्यावेळी पंतप्रधान मोदींवर बोलणे याला जनता उत्तर देईल. दसरा मेळाव्यासाठी स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी परवानगी मागितली आहे. आम्ही बाळासाहेबांच्या हिदुत्ववादाचे खरे वारसदार आहोत. त्यांच्या खोक्याचा हिशोब माझ्याकडे आहे. योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ. ५० आमदार, १२ खासदार एवढा मोठा निर्णय होत नाही. बोलायला ठीक आहे. त्यांच्याकडे आरोप करण्याशिवाय काहीच शिल्लक नाही असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिले. 
 

Web Title: Chief Minister Eknath Shinde's attack on Shivsena Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.