धनगर आरक्षासाठी मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला जाणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 04:31 AM2018-12-15T04:31:05+5:302018-12-15T06:50:51+5:30

धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्रामध्ये बाजू मांडण्याकरता आपण स्वत: दिल्लीला जाऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला दिले.

Chief Minister Fadnavis to go to Delhi for Dhanagar reservation | धनगर आरक्षासाठी मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला जाणार!

धनगर आरक्षासाठी मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला जाणार!

Next

मुंबई : धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्रामध्ये बाजू मांडण्याकरता आपण स्वत: दिल्लीला जाऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला दिले. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय तातडीने करा, अशी मागणी जानकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
धनगर समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणाबाबत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने (टिस) अहवाल दिलेला आहे. त्या आधारे अनुसूचित जमातींच्या सध्याच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता धनगर समाजाला अनुसूचित जमातींचे आरक्षण देण्याची आपली भूमिका आहे, असे मुख्यमंत्र्यांनी चर्चेत स्पष्ट केले. केंद्रापुढे या संदर्भात भूमिका मांडण्यासाठी स्वत: दिल्लीला जाण्याची आपली तयारी असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. जानकर यांच्यासोबत आ. राहुल कुल, रत्नाकर गुट्टे, एस. एन.अक्कीसागर, श्रद्धा भातंब्रेकर, भारती पाटील आदी होते.

Web Title: Chief Minister Fadnavis to go to Delhi for Dhanagar reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.