मुख्यमंत्री फडणवीस करणार ‘जीईओ’चे लोकार्पण

By admin | Published: June 30, 2017 03:12 AM2017-06-30T03:12:50+5:302017-06-30T03:12:50+5:30

गुजराती, मारवाडी आणि जैन समुदायातील प्रतिभावंतांना प्रोत्साहन तसेच सामाजिक कार्यासाठी स्थापन केलेल्या गुजराती एन्रिचमेंट

Chief Minister Fadnavis launches GEO's release | मुख्यमंत्री फडणवीस करणार ‘जीईओ’चे लोकार्पण

मुख्यमंत्री फडणवीस करणार ‘जीईओ’चे लोकार्पण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गुजराती, मारवाडी आणि जैन समुदायातील प्रतिभावंतांना प्रोत्साहन तसेच सामाजिक कार्यासाठी स्थापन केलेल्या गुजराती एन्रिचमेंट आॅर्गनायझेशन (जीईओ) या स्वयंसेवी संस्थेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्यास परमपूज्य गणीवर्य नयपद्मसागर महाराज यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात रविवारी २ जुलै रोजी सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि विजय रुपाणी यांच्यासह समाजातील विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती जीईओ संघटनेचे संस्थापक व संचालक मनिषभाई शहा यांनी दिली. मुंबईतील जैन समुदायाची आघाडीची संघटना जैन इंटरनॅशनल या संस्थेच्या पुढाकारातून गुजराती एन्रिचमेंट आॅर्गनायझेशन (जीईओ)ची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यक्रमास वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, बँकांचे अधिकारी, न्यायाधीश, उद्योगपती, व्यापारी, सीए फेडरेशन आणि लॉयर फेडरेशनचे मान्यवर सभासद उपस्थित राहणार आहेत. जीईओ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मुख्यत्वे गुजराती, मारवाडी आणि जैन समाजातील प्रतिभावंत लोकांना प्रोत्साहन आणि सहयोग दिला जाणार आहे.

Web Title: Chief Minister Fadnavis launches GEO's release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.