मुख्यमंत्री कन्येसोबत शाळेत रमले

By Admin | Published: January 15, 2015 05:04 AM2015-01-15T05:04:23+5:302015-01-15T05:04:23+5:30

त्या क्षणांपुरते ते मुख्यमंत्री नव्हते तर केवळ एक पिता होते... इतर पालकांप्रमाणेच तेदेखील आज मुलीसोबत शाळेत गेले,

The Chief Minister got into the school with the girl | मुख्यमंत्री कन्येसोबत शाळेत रमले

मुख्यमंत्री कन्येसोबत शाळेत रमले

googlenewsNext

मुंबई : त्या क्षणांपुरते ते मुख्यमंत्री नव्हते तर केवळ एक पिता होते... इतर पालकांप्रमाणेच तेदेखील आज मुलीसोबत शाळेत गेले, तिच्या सवंगड्यांबरोबर रमले आणि ‘डॅडस् डे’ साजरा करून परत आपल्या कामाला लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आजची सकाळ जरा निराळीच ठरली.
मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर फडणवीस यांनी आपले बिऱ्हाड नागपुरहून मुंबईला हलविले. कन्या दिविजा हिने मलबार हिल भागातील एका शाळेत सिनिअर केजीमध्ये अलिकडेच प्रवेश घेतला. आज तिच्या शाळेत ‘डॅडस् डे’ होता. त्यामुळे वडील देवेंद्र यांना कन्येच्या शाळेत हजेरी लावणे क्रमप्राप्त. मग काय, अत्यंत व्यस्त अशा दिनक्रमातून थोडा वेळ काढून कन्येसोबत त्यांनी शाळा गाठली. तेथील शिक्षक, पालकांशी मनमोकळ्या गप्पा केल्या. मुले आणि पालकांच्या संगतीत खेळ खेळत खऱ्या अर्थाने त्यांनी आज ‘पालक’मंत्र्यांची भूमिका निभावली. साक्षात बाबा सोबत आल्याने दिविजाही हरखून गेली होती. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: The Chief Minister got into the school with the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.