अतिवृष्टीतील बाधितांना नुकसानभरपाई , एकनाथ शिंदेंची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली मान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 04:06 AM2017-09-08T04:06:54+5:302017-09-08T04:07:18+5:30
२९ आॅगस्ट रोजी पावसाने उडवलेल्या हाहाकारात मुंबई आणि ठाण्यातील हजारो नागरिकांना फटका बसला. ठाण्यातील किमान सहा जण अतिवृष्टीत वाहून गेले असून त्यांच्या कुटुंबीयांची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.
मुंबई : २९ आॅगस्ट रोजी पावसाने उडवलेल्या हाहाकारात मुंबई आणि ठाण्यातील हजारो नागरिकांना फटका बसला. ठाण्यातील किमान सहा जण अतिवृष्टीत वाहून गेले असून त्यांच्या कुटुंबीयांची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असल्याची बाब पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेस आणून देत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या मुंबई तसेच ठाणेकरांना नुकसानभरपाई देण्याची आग्रही मागणी गुरुवारी केली. मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे यांची मागणी तत्काळ मान्य करत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्यांना विशेष बाब म्हणून मदत करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केली.
मदत जाहीर केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस, मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्रिमंडळातील सहकाºयांचे आभार मानले.