मुख्यमंत्र्यांकडे १० पेक्षा अधिक खाती, तर फडणवीसांकडे सात खात्यांचा कार्यभार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 05:21 PM2022-08-14T17:21:21+5:302022-08-14T17:23:33+5:30

मंत्रिमंडळात महिला आमदार नाही, महिला व बालकल्याण विभागाचा कार्यभार मंगलप्रभात लोढांकडे.

Chief Minister has more than 10 portfolios while Fadnavis has six portfolios | मुख्यमंत्र्यांकडे १० पेक्षा अधिक खाती, तर फडणवीसांकडे सात खात्यांचा कार्यभार

मुख्यमंत्र्यांकडे १० पेक्षा अधिक खाती, तर फडणवीसांकडे सात खात्यांचा कार्यभार

googlenewsNext

राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला. त्यानंतर खातेवाटप कधी होणार आणि कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं दिलं जाईल याबाबत चर्चा सुरू होत्या. दरम्यान, मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप रविवारी जाहीर केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १० पेक्षा अधिक खात्यांचा कार्यभार असणार आहे. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभागासह सात खात्यांचा कार्यभार सोपवण्यात आलाय.

रविवारी जाहीर केलेल्या खातेवाटपानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे  सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभागांची जबाबदारी असणार आहे.

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार या खात्यांचा कार्यभार असेल. काही दिवसांपूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. परंतु या विस्तारात महिला आमदारांना संधी देण्यात आली नव्हती. दरम्यान, आता महिला व बाल कल्याण विभागाचा कार्यभार आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे असणार आहे. तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल आणि उदय सामंत यांच्याकडे उद्योग खात्याचा कार्यभार असेल.

Web Title: Chief Minister has more than 10 portfolios while Fadnavis has six portfolios

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.