राजाच्या चरणी मुख्यमंत्री!

By admin | Published: September 10, 2016 01:51 AM2016-09-10T01:51:27+5:302016-09-10T01:51:27+5:30

सेलीब्रिटींचा ओघ कायम असलेल्या ‘लालबागचा राजा’चरणी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली

Chief minister of the king! | राजाच्या चरणी मुख्यमंत्री!

राजाच्या चरणी मुख्यमंत्री!

Next


मुंबई : सेलीब्रिटींचा ओघ कायम असलेल्या ‘लालबागचा राजा’चरणी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. त्याचे फोटोही मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर टाकले. दरम्यान, सायंकाळी मुंबईच्या डबेवाल्यांसाठीही मंडळाने विशेष दर्शनाची व्यवस्था केली होती.
लालबाग राजाच्या दर्शनासाठी याआधी बिग बी अमिताभ बच्चन, जितेंद्र, शिल्पा शेट्टी, अमित शाह, सुरेश प्रभू अशा दिग्गज राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींनी राजाचे दर्शन घेतले आहे. यामध्ये मुंबईच्या डबेवाल्यांनही विशेष वेळ देण्याची मागणी मुंबई डबे वाहतूक मंडळाने केली होती. ती मान्य करत मंडळाने डबेवाल्यांना गुरुवारी विशेष दर्शनाची व्यवस्था केली होती.
दरम्यान, शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मानही मंडळाने केला. या वेळी भावुक झालेल्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. देशाच्या सीमेवर आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या जवानांमुळेच आपण मुक्तपणे उत्सव साजरे करू शकतो, अशी प्रतिक्रिया मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी व्यक्त केली. त्यामुळे शहिदांच्या कुटुंबीयांचा गौरव केल्याने मंडळाची मान उंचावणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>मुखदर्शन रांगेत विजेचा खांब कोसळला
काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्गावर सायंकाळनंतर लालबागचा राजा मुखदर्शनाची रांग लागते. याच ठिकाणी दुपारी पावणेचारच्या सुमारास हकोबा गोदामाजवळील विजेचा खांब कोसळला. सुदैवाने रांगेत भाविक नसल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र खांबाखाली उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाच्या काचेचा चक्काचूर झाला. काळाचौकी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Chief minister of the king!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.