मुख्यमंत्री, MPSC अन् निवडणूक आयोग...; ट्रोलिंगनंतर एकनाथ शिंदेंनी दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 08:36 AM2023-02-23T08:36:35+5:302023-02-23T08:41:45+5:30

‘ही पद्धत २०२५ पासून लागू करण्याची मागणी होती, त्याप्रमाणे निवडणूक आयोगाला आम्ही पत्र लिहिले आहे, कळवले आहे असं मुख्यमंत्री म्हणाले होते.

Chief Minister, MPSC and Election Commission...; Eknath Shinde's explanation after social media trolling | मुख्यमंत्री, MPSC अन् निवडणूक आयोग...; ट्रोलिंगनंतर एकनाथ शिंदेंनी दिली कबुली

मुख्यमंत्री, MPSC अन् निवडणूक आयोग...; ट्रोलिंगनंतर एकनाथ शिंदेंनी दिली कबुली

googlenewsNext

मुंबई - एमपीएससी परीक्षेच्या नवीन पेपर पॅटर्नविरोधात विद्यार्थ्यांनी सध्या आक्रमक पवित्रा घेतला आहे. नवीन पेपर पॅटर्न २०२५ पासून लागू करण्याची मागणी विद्यार्थ्यांची आहे. याबाबत बुधवारी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. पण, महाराष्ट्र लोकसेवा आयोग बोलण्याऐवजी चुकून ते निवडणूक आयोग म्हणाले आणि नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले.

‘ही पद्धत २०२५ पासून लागू करण्याची मागणी होती, त्याप्रमाणे निवडणूक आयोगाला आम्ही पत्र लिहिले आहे, कळवले आहे. निवडणूक आयोगाकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. कालही पुन्हा पत्र दिले आहे आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या भूमिकेसोबत सरकार सहमत आहे,’ असे ते म्हणाले. अलीकडेच निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हदेखील शिंदे गटाला देण्याचा महत्त्वाचा निर्णय दिल्यामुळे आयोगाबाबत चर्चा असतानाच शिंदे यांनी हे अजब वक्तव्य केल्यामुळे व्हिडीओ लगेच व्हायरल झाला. लागलीच राष्ट्रवादी काँग्रेसने व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आणि ‘यांना उठता, बसता, खाता, पिता, झोपता, जागता, जाता, येता, बोलता फक्त आणि फक्त निवडणूक आयोगच दिसतो वाटतं, मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याऐवजी निवडणूक आयोगाला पाठवले, यातच सगळे आले,’ अशी खोचक टीका केली.  

व्हिडीओ व्हायरल होत असून, आता एमपीएससीचा निकालही निवडणूक आयोग देणार वाटते, अशी चर्चा सुरू आहे. मात्र या व्हिडिओवरून मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, एमपीएससीच्या प्रश्नावर निवडणूक आयोग हे माझ्याकडून अनावधानाने झाले आहे. नेहमी निवडणूक आयोग, कोर्ट अशा गोष्टी चालू असल्यामुळे असे म्हणले गेले असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. 

Web Title: Chief Minister, MPSC and Election Commission...; Eknath Shinde's explanation after social media trolling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.