मुख्यमंत्री पदाचे स्वप्न नाही, पण राज्य मात्र हवे
By admin | Published: September 7, 2014 03:02 AM2014-09-07T03:02:24+5:302014-09-07T03:02:24+5:30
मुख्यमंत्री पदाचे स्वप्न माङो नाही़ परंतु मला राज्य पाहिजे, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या अपेक्षा आपण पूर्ण करू, अशी ग्वाही शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली़
Next
नांदेड : मुख्यमंत्री पदाचे स्वप्न माङो नाही़ परंतु मला राज्य पाहिजे, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या अपेक्षा आपण पूर्ण करू, अशी ग्वाही शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली़
ठाकरे म्हणाले, की शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून माङयाकडून असलेल्या अपेक्षा मला स्पष्टपणो जाणवतात़ तुमच्या डोळ्यातील वेदनाही माङया ध्यानी आहेत़ तुम्हाला शिवसेनेचाच आधार वाटत आह़े त्यामुळे राज्याची जबाबदारी माङयावर सोपवा, मी तुमच्या विकासाची जबाबदारी घेतो, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला़
राष्ट्रवादीवर प्रखर टीका करताना ते म्हणाले, फोडाफोडीचे राजकारण शरद पवार यांनीच केल़े शिवसेनाप्रमुखांशी गद्दारी करून छगन भुजबळांना फोडल़े राष्ट्रवादी पक्षच फुटीरांचा आह़े आता राष्ट्रवादीला कळ लागली असून पक्षही थेंब थेंब गळत आहे, अशी मल्लिनाथीही ठाकरे यांनी केली़
काँग्रेस आघाडी सरकारचे विसजर्न करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकत्र्याना केल़े (प्रतिनिधी)
राज्यात युती सरकारच्या काळातील कामाची तुलना झाली पाहिज़े आघाडी सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आह़े अशा भ्रष्ट सरकार विरोधात जनआंदोलनाची सुरुवात माँसाहेबांच्या स्मृतिदिनापासून करत आह़े शिवसैनिकांनी परिवर्तनाच्या या लढय़ात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन लोहा येथे आयोजित मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केल़े