मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकला ठणकावले

By admin | Published: May 25, 2017 02:29 AM2017-05-25T02:29:03+5:302017-05-25T02:29:03+5:30

कर्नाटक सरकारच्या महाराष्ट्रविरोधी भूमिकेचा निषेध करत, ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यावर बंदी आणण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावले

The Chief Minister shocked Karnataka | मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकला ठणकावले

मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकला ठणकावले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कर्नाटक सरकारच्या महाराष्ट्रविरोधी भूमिकेचा निषेध करत, ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यावर बंदी आणण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावले.
सार्वजनिक कार्यक्रमात ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणा दिल्यास, संबंधित लोकप्रतिनिधींचे पद रद्द करण्यात येईल, तसा कायदा आगामी अधिवेशनात करण्यात येईल, असा इशारा कर्नाटकचे नगरविकासमंत्री रोशन बेग यांनी परवा बेळगाव येथे दिला होता. बेग यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. कोल्हापुरात कर्नाटकच्या बसगाड्यांवर ‘जय महाराष्ट्र’चे फलक लावण्यात आले, तर मुंबईतील कर्नाटक संघाच्या कार्यालयावरील नामफलकास काळे फासण्यात आले. कर्नाटकच्या महाराष्ट्रविरोधी भूमिकेचा राज्य सरकारनेदेखील निषेध नोंदविला आहे. तसे पत्र कर्नाटक आणि केंद्र सरकारला पाठविण्यात आले आहे, तर स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सोलापूर दौऱ्यात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

बेळगावमध्ये काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये शिवसेनेचे नेते दिवाकर
रावते सहभागी होण्यासाठी कोल्हापुरात आले खरे. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीने शिवसेनेबाबत अनुद्गार काढल्याने त्यांच्या बेळगाव दौऱ्याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

कर्नाटकला आम्ही पाणी, वीज आणि आरोग्य सेवा देत असताना, त्यांची ही भाषा असेल, तर आम्हाला विचार करावा लागेल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Web Title: The Chief Minister shocked Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.