मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब घेतले कुलदेवतेचे दर्शन

By admin | Published: July 5, 2017 02:39 AM2017-07-05T02:39:24+5:302017-07-05T02:39:24+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीरा-नृसिंहपूर येथे आपल्या कुलदैवताचे दर्शन घेऊन येथे चालू असलेल्या विविध विकासकामांचा

The Chief Minister took a sympatom | मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब घेतले कुलदेवतेचे दर्शन

मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब घेतले कुलदेवतेचे दर्शन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बावडा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीरा-नृसिंहपूर येथे आपल्या कुलदैवताचे दर्शन घेऊन येथे चालू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता, मातोश्री  सरिता यांच्यासह कुलदैवत असणाऱ्या नीरा-नृसिंहपूर (ता. इंदापूर) येथील लक्ष्मी-नृसिंहाची विधिवत महापूजा व आरती केली.
या वेळी आमदार दत्तात्रय भरणे, पुजारी कमलेश डिंगरे, भाजपा तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे, अतुल तेरखेडकर, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य माऊली चवरे, तानाजीराव थोरात, बाबासाहेब चवरे, माऊली वाघमोडे, सचिन आरडे, मारुती वणवे, सदानंद शिरदाळे, अ‍ॅड. नीलेश शिंगाडे, रामचंद्र निंबाळकर, श्रीकांत दंडवते, जगदीश सुतार, नरहरी काळे, नाथा मोरे, दिगांबर डिंगरे, दशरथ राऊत, संतोष मोरे, दत्तात्रय ताटे-देशमुख आदींसह ग्रामस्थ व भाजपा कार्यकर्ते, विविध विभागाचे अधिकारी
उपस्थित होते.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्या-ज्या वेळी इंदापूर तालुक्यात येतात, त्यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांची गर्दी नेहमीच पाहायला मिळते. ती आजही पाहायला मिळाली. भाजपाचे कार्यकर्ते पाठीमागे पण राष्ट्रवादीचे पुढे दिसत होते. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनाही संभ्रमात पडल्याचा अनुभव मिळाला. यावेळी नीरा-नृसिंहपूर येथे मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उदयसिंह पाटील, कृष्णा यादव, महादेव घाडगे, विलासराव वाघमोडे, करणसिंह घोलप, लालासो पवार, कांतिलाल झगडे आदी उपस्थीत होते.
मुख्यमंत्री प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील, अशी आशा होती. त्यातून बोलण्यासाठी देखील तशी पत्रकारांनी विनंती केली. परंतु त्यांनी हात जोडून नकार दिला.

दर्जेदार कामे करा...
मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष्मी-नृसिंह देवस्थान येथील महापूजा व दर्शन झाल्यावर येथील पुरातन असणाऱ्या माणकेश्वर वाडा येथे सुरू असलेल्या भक्तनिवास, पर्यटन भवन, बहुउद्देशीय इमारत आदी कामांची पाहणी करून दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या.

Web Title: The Chief Minister took a sympatom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.