मुख्यमंत्री निघाले परदेश दौ-यावर; समृद्धी महामार्ग, पुणे विमानतळ उभारणीसाठी होणार करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 01:05 AM2017-08-02T01:05:07+5:302017-08-02T01:05:17+5:30

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, पुणे विमानतळ, वांद्रे शासकीय कॉलनी पुनर्विकास, अहमदनगर जिल्ह्यातील सुपा औद्योगिक क्लस्टरचा विकास, कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्प आणि बंदरांच्या विकासासाठी विविध करार

Chief Minister on tour abroad; The agreement will be taken for the construction of the airport, the Sanchri Dhami Highway, Pune | मुख्यमंत्री निघाले परदेश दौ-यावर; समृद्धी महामार्ग, पुणे विमानतळ उभारणीसाठी होणार करार

मुख्यमंत्री निघाले परदेश दौ-यावर; समृद्धी महामार्ग, पुणे विमानतळ उभारणीसाठी होणार करार

googlenewsNext

यदु जोशी।
मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, पुणे विमानतळ, वांद्रे शासकीय कॉलनी पुनर्विकास, अहमदनगर जिल्ह्यातील सुपा औद्योगिक क्लस्टरचा विकास, कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्प आणि बंदरांच्या विकासासाठी विविध करार करण्याकरिता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १८ ते २३ आॅगस्टदरम्यान एका शिष्टमंडळासह परदेश दौºयावर जात आहेत.
सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि जपान या तीन देशांच्या दौºयात राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांना गती दिली जाणार आहे. यातील बहुतेक करार हे त्या देशांची सरकारे, वित्तीय संस्था आणि महाराष्ट्र शासन यांच्यात होणार आहेत.
पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार आहे, तर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. वांद्रे शासकीय वसाहतीच्या पुनर्विकासाची शासनाची योजना आहे. त्यासाठी ३० हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या दौºयात दक्षिण कोरिया सरकारच्या कोरियन लँड अँड हाउसिंग कॉर्पोरेशनशी करार होण्याची शक्यता आहे.
सोबत शिवसेनेचे शिंदे जाणार-
मुख्यमंत्र्यांच्या या दौºयात सार्वजनिक उपक्रममंत्री शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे सोबत असतील. समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा विरोध असल्याचे चित्र असताना, शिंदे यांनी मात्र हा मार्ग होणे आवश्यक असल्याची ठाम भूमिका घेतली आहे.
शिष्टमंडळात वरिष्ठ अधिकारी-
अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) सुनील पोरवाल, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव वल्सा नायर सिंग (नागरी वाहतूक), एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, एमएमआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार आणि एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी हे मुख्यमंत्र्यांसोबतच्या शिष्टमंडळात असतील.

Web Title: Chief Minister on tour abroad; The agreement will be taken for the construction of the airport, the Sanchri Dhami Highway, Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.