मराठी भावगीतांना समृद्ध करणारे व्यक्तिमत्त्व हरपले  - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 10:41 AM2018-10-30T10:41:37+5:302018-10-30T10:41:53+5:30

ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांच्या निधनाने शब्दांसोबतच सुरांवर प्रभुत्व असलेला आणि मराठी भावगीतांचे विश्व समृद्ध करणारा एक अस्सल कलावंत हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Chief Minister tribute to Yashwant Deo | मराठी भावगीतांना समृद्ध करणारे व्यक्तिमत्त्व हरपले  - मुख्यमंत्री

मराठी भावगीतांना समृद्ध करणारे व्यक्तिमत्त्व हरपले  - मुख्यमंत्री

Next

मुंबई - ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांच्या निधनाने शब्दांसोबतच सुरांवर प्रभुत्व असलेला आणि मराठी भावगीतांचे विश्व समृद्ध करणारा एक अस्सल कलावंत हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, अनेक भावगीतांसह देव यांनी नाटकांना दिलेले संगीतही कायम स्मरणात राहील.

एक अष्टपैलू संगीतकार म्हणून यश मिळवण्यासोबतच त्यांनी लिहिलेली अनेक गीतेही लोकांच्या ओठावर सहज येतात. नव्या पिढीच्या आवडींशी नाळ जोडतानाच संगीताचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांची अविरत धडपड होती. त्यांच्या निधनाने नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला आहे.

संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ कलावंत हरपले- विखे पाटील
कवी, गीतकार आणि संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांच्या निधनाने मराठी संगीत क्षेत्रात अधिराज्य गाजविणारे एक प्रयोगशील ज्येष्ठ कलावंत काळाच्या पडद्याआड गेले, या शब्दात विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. देव यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, वडिलांकडून संगीताचा वारसा लाभलेल्या यशवंत देवांनी आपले सर्वस्व या क्षेत्रासाठी समर्पित केले होते.

आपल्या सिद्धहस्त लेखणीतून शब्दबद्ध झालेल्या गीत रचना संगीत दिग्दर्शक या नात्याने मराठी रसिकांसमोर आणून अजरामर केल्या. यशवंत देवांनी लोकगितांची परंपरा जोपासतानाच कलाकार घडविण्यासाठी कार्यशाळा घेण्याची संकल्पना सुरू ठेवून संगीत क्षेत्रासाठी दिलेले योगदान मोलाचे आहे, असे सांगून विखे पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Web Title: Chief Minister tribute to Yashwant Deo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.