“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २० आमदारांसह अभिजीत बिचुकलेंच्या संपर्कात”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 06:35 PM2022-06-21T18:35:05+5:302022-06-21T18:35:16+5:30
मनसेचा जोरदार टोला.
राज्यात विधान परिषद निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्यानंतर शिवसेनेतील नाराजी आता उघड झाली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रात मोठं राजकीय नाट्य सुरू झालं आहे. एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे काही आमदार सूरतमध्ये पोहोचलेत. दरम्यान, यानंतर मनसेचे नेते गजानन काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
“मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे २० आमदारांसह अभिजीत बिचुकलेच्या संपर्कात,” असं म्हणत मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. यापूर्वी मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे आणि अमेय खोपकर यांनीदेखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.
मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे २० आमदारासह अभिजीत बिचुकलेच्या संपर्कात ...😂
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) June 21, 2022
‘पत्त्यांचा बंगला कोसळणार’
"शिवसेनेच्या बैठकीत ५५ आमदारांपैकी फक्त १८ विधानसभा आमदार उपस्थित... तरी पुढील २५ वर्ष मोठे नवाबच मुख्यमंत्री असणार विश्वप्रवक्ते यांचा दावा... मनात राम न ठेवता फक्त नौटंकी म्हणून अयोध्येला जाऊन आलात की हे असं होतं... नकली हिंदुत्ववाद्यांचा पत्त्याचा बंगला कोसळणार..." असं गजानन काळे यांनी आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.