"कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात आणणारच"; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार
By देवेश फडके | Published: January 17, 2021 02:12 PM2021-01-17T14:12:58+5:302021-01-17T14:16:28+5:30
कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात आणणारच, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. हुतात्मा दिनानिमित्त कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील शहिदांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले.
मुंबई :कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात आणणारच, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. हुतात्मा दिनानिमित्त कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील शहिदांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले.
महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मा दिनी विनम्र अभिवादन! सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग तसेच समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबीयांना मानाचा मुजरा!, असे एका ट्विटमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मा दिनी विनम्र अभिवादन!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 17, 2021
सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग तसेच समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबीयांना मानाचा मुजरा!
कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत. या अभिवचनासह हूतात्म्यांना विनम्र अभिवादन, असे दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही दोन्ही ट्विट्स करण्यात आली आहेत.
बेळगाव सीमा भागातील हुतात्म्यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात दिलेले बलिदान कदापि वाया जाणार नाही, जोपर्यंत बेळगाव आणि सीमा भाग महाराष्ट्रात येईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण न्यायालयीन लढाई नक्कीच जिंकू. सीमावासीयांच्या लढ्यातील हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.