Corona Vaccination : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 12:23 PM2021-04-08T12:23:47+5:302021-04-08T12:26:01+5:30
Corona Vaccination : ११ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांनी घेतला पहिला डोस
सध्या राज्यात झपाट्यानं कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी आज (गुरूवार) कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांनी यापूर्वी ११ मार्च रोजी मुंबईतील जे.जे.रुग्णालयात जाऊन लसीचा पहिला डोस घेतला होता.
मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी आज कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतला. मुख्यमंत्री कार्यालयानं ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली आहे. यापूर्वी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन लसीचा दुसरा डोस घेतला होता. त्यावेळी त्यांनी जे पात्र आहेत अशा लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी करण्याचं आवाहन केलं होतं.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोविड लसीचा दुसरा डोस घेतला.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 8, 2021
CM Uddhav Balasaheb Thackeray took his second dose of COVID vaccine today.#BreakTheChainpic.twitter.com/umpIaxGMlk
लसींचा तुटवडा असल्याची आरोग्यमंत्र्यांनी दिली होती माहिती
महाराष्ट्राने लसीकरणाबाबतीत देशात आघाडी घेतली आहे. पण केंद्र सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या लसींचा पुरवठा कमी पडतोय, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली होती. लसीच्या पुरवठ्यासंदर्भात टोपे यांनी यावेळी केंद्रावर संताप देखील व्यक्त होता. त्यानंतर केंद्रानंही यावर प्रतिक्रिया देत लसींचा योग्य प्रकारे पुरवठा केला जात असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.