Uddhav Thackeray : अवघे राज्य चिंतेत! नव्या वर्षात कोरोनाचे सावट हाेणार गडद; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २ दिवसांत घेणार निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 06:50 AM2021-12-31T06:50:43+5:302021-12-31T06:52:37+5:30

Uddhav Thackeray : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात नव्या वर्षांत पुन्हा निर्बंध लावावे लागतील, अशा सूचना टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिल्या. निर्बंधांबाबत दोन दिवसांत निर्णयाची शक्यता आहे.

Chief Minister Uddhav Thackeray will take a decision in 2 days on Coronavirus | Uddhav Thackeray : अवघे राज्य चिंतेत! नव्या वर्षात कोरोनाचे सावट हाेणार गडद; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २ दिवसांत घेणार निर्णय 

Uddhav Thackeray : अवघे राज्य चिंतेत! नव्या वर्षात कोरोनाचे सावट हाेणार गडद; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २ दिवसांत घेणार निर्णय 

Next

मुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि बाधित रुग्णांची संख्या पाच हजारांवर गेल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 
आरोग्य मंत्री, आरोग्य विभागाचे प्रतिनिधी, पोलीस प्रशासन आणि टास्क फोर्सच्या सदस्यांसोबत घेतलेल्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात नव्या वर्षांत पुन्हा निर्बंध लावावे लागतील, अशा सूचना टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिल्या. निर्बंधांबाबत दोन दिवसांत निर्णयाची शक्यता आहे.

कोरोना स्थितीच्या आढाव्याबाबत गुरुवारी दोन तास बैठक झाली. गर्दी टाळण्यावर निर्बंधांमध्ये भर दिला जाणार आहे. शक्यतो अर्थचक्र थांबणार नाही, हे बघणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आणावी किंवा मर्यादित उपस्थितीत परवानगी द्यावी, अशा सूचना टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिल्या. रेमडेसिविरप्रमाणे उपचार करताना दुष्परिणाम होऊ नये, यासाठी अभ्यास केला जाईल, असेही टोपे म्हणाले.

मुख्यमंत्री काय म्हणाले...
आपण निर्बंध आणणार असू तर त्याचे समर्थन कसे करणार? निर्बंध लादताना काय कारणे देणार आहोत. त्याबाबत नागरिकांना व्यवस्थित माहिती द्यावी लागेल.

 बैठकीत काय झाली चर्चा?
- शाळा बंद करण्याबाबत कोणताही निर्णय नाही
- शाळांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू होतील
- नवीन वर्षाचे स्वागत करताना गर्दी टाळण्यावर भर देणार.  सामूहिक संसर्गाबाबत अजून निष्कर्ष काढलेला नाही
- ‘वर्क फ्रॉम होम’बाबत चर्चा झाली, त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेणार
- १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण ३ जानेवारीपासून सुरू करणार
- कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांत लसीकरणाचा वेग वाढविण्यावर भर

७ दिवसांत १० हजारांहून अधिक रुग्ण
             मुंबई                ठाणे
तारीख     चाचण्या     बाधित     चाचण्या     बाधित 
३० डिसेंबर     ४६,३३७    ३६७१    उपलब्ध झाले नाही
२९ डिसेंबर     ५१,८४३     २५१०    १६,४६२    ८६४
२८ डिसेंबर     ३२,३६९    १३७७    १४,५१०    ५८२
२७ डिसेंबर     ४३,३८३     ८०९    १९,९११    ३११
२६ डिसेंबर     ३४,८१९     ९२२    १६,९४२    २४९
२५ डिसेंबर     ४२,४२७     ७५७    १४,६८८    २३५
२४ डिसेंबर     ४०,४७२     ६८३    २०,९८०    २४६

निर्बंधाबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील. गर्दी नको, या मुद्द्यावर सर्वांचे एकमत आहे. त्यानुसार निर्णय घेतला जाईल.
    - राजेश टोपे, आरोग्य मंत्री

Web Title: Chief Minister Uddhav Thackeray will take a decision in 2 days on Coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.