धनगर वेशभूषेसह मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर धडकणार, याचिकाकर्ते आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 04:35 AM2018-03-11T04:35:48+5:302018-03-11T04:35:48+5:30
धनगर आरक्षण प्रकरणातील याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर रविवारी धडक देण्याचा इशारा दिला आहे. धनगर समाजास एसटी प्रवर्गातून मिळणा-या आरक्षण प्रक्रियेस होणा-या विलंबाचा जाब विचारण्यासाठी, पाटील धनगर समाजाच्या पारंपरिक वेशभूषेत रविवारी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर धडक देणार आहेत.
मुंबई - धनगर आरक्षण प्रकरणातील याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर रविवारी धडक देण्याचा इशारा दिला आहे. धनगर समाजास एसटी प्रवर्गातून मिळणा-या आरक्षण प्रक्रियेस होणा-या विलंबाचा जाब विचारण्यासाठी, पाटील धनगर समाजाच्या पारंपरिक वेशभूषेत रविवारी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर धडक देणार आहेत.
किमान धनगर समाजातील मेंढपाळांच्या वेशभूषा पाहून तरी मुख्यमंत्र्यांना आरक्षणाची आठवण येईल, म्हणून हे आंदोलन करत असल्याचे पाटील यांनी सांगितले. नेमके आरक्षणासाठी काय करावे? असा सवाल या वेळी उपस्थित केला जाईल. या आधीच्या सरकारने समाजाची फसवणूक केली आहे. त्याचीच पुनरावृत्ती युती सरकारकडून सुरू आहे. आरक्षणाचे राजकारण करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देता येणार नाही, असे तरी स्पष्ट करण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, धनगर आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर १९ मार्चला सुनावणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्या वेळी सरकारविरोधीत तीव्रपणे भूमिका मांडण्यात येईल. मात्र, जोपर्यंत आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाई सुरू ठेवणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट
केले.