पाणीप्रश्नी मुख्यमंत्री औरंगाबादला जाणार, कामे दर्जेदार करण्याचे दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 11:58 AM2022-06-18T11:58:20+5:302022-06-18T11:58:53+5:30

Water Issue in Aurangabad : औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष, वाक्-युद्ध पेटले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत या प्रश्नावर बैठक घेतली. औरंगाबादच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची आपण स्वत: पाहणी करणार असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. 

Chief Minister will go to Aurangabad on water issue, instructed to make work quality | पाणीप्रश्नी मुख्यमंत्री औरंगाबादला जाणार, कामे दर्जेदार करण्याचे दिले निर्देश

पाणीप्रश्नी मुख्यमंत्री औरंगाबादला जाणार, कामे दर्जेदार करण्याचे दिले निर्देश

googlenewsNext

मुंबई : औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष, वाक्-युद्ध पेटले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत या प्रश्नावर बैठक घेतली. औरंगाबादच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची आपण स्वत: पाहणी करणार असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. 
औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत याची दक्षता घ्या आणि कामाचा सर्वोत्कृष्ट दर्जा ठेवा. नव्या योजनेची वेळापत्रकानुसार कामे झालीच पाहिजेत, हे परत एकदा सांगून मुख्यमंत्र्यांनी  जुनी जलवाहिनी बदलण्यासाठीचा प्रस्ताव सुद्धा  सादर करण्याचे निर्देश दिले. पुढील आढावा बैठकीस कंत्राटदार कंपनीच्या मालकांनी किंवा कंपनीच्या वरिष्ठ प्रतिनिधीने उपस्थित राहावे, असेही ते म्हणाले.
जायकवाडी धरणातील उद्भव विहीर घेण्यासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला प्रधान सचिव वने मार्फत प्रस्ताव सादर केला आहे, त्याला लवकरात लवकर मान्यता मिळाली पाहिजे. मी प्रसंगी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री यांच्याशीही बोलेल, पण ही परवानगी मिळेपर्यंत इतर कामे थांबू देऊ नका, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सुभाष देसाई यांनी देखील कामाच्या प्रगतीचा आढावा घेत असल्याचे सांगितले.

Web Title: Chief Minister will go to Aurangabad on water issue, instructed to make work quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.