मुख्यमंत्री वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेसाठी आज डाओसला जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 01:57 AM2018-01-21T01:57:20+5:302018-01-21T01:57:33+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वित्झर्लंडधील डाओसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी रविवारी रवाना होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहा केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी या परिषदेत सहभागी होणार आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वित्झर्लंडधील डाओसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी रविवारी रवाना होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहा केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी या परिषदेत सहभागी होणार आहेत. मोदी यांच्या सूचनेनुसार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या परिषदेत सहभागी होणार आहेत.
फेब्रुवारीमध्ये मुंबईत होणाºया मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक येण्याच्या दृष्टीने डाओसमधील परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस प्रयत्न करणार आहेत. विविध देशांचे प्रमुख, मंत्री, वरिष्ठ अधिकाºयांशी ते तीन दिवसांत चर्चा करतील.