मुख्यमंत्र्यांची घोषणा; प्रकाश मेहतांच्या ‘त्या’ प्रकरणाची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 05:32 AM2017-08-01T05:32:52+5:302017-08-01T05:32:57+5:30

ताडदेव येथील एमपी मिल्स कम्पाउंडच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात अतिरिक्त बांधकाम हक्क बिल्डरला देऊन त्याचा ५०० ते ८०० कोटी रुपयांचा फायदा करून देण्याचा गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचा प्रयत्न होता

Chief Minister's announcement; Investigation of Prakash Mehta's 'That' case | मुख्यमंत्र्यांची घोषणा; प्रकाश मेहतांच्या ‘त्या’ प्रकरणाची चौकशी

मुख्यमंत्र्यांची घोषणा; प्रकाश मेहतांच्या ‘त्या’ प्रकरणाची चौकशी

Next

विशेष प्रतिनिधी ।
मुंबई : ताडदेव येथील एमपी मिल्स कम्पाउंडच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात अतिरिक्त बांधकाम हक्क बिल्डरला देऊन त्याचा ५०० ते ८०० कोटी रुपयांचा फायदा करून देण्याचा गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचा प्रयत्न होता, असा थेट हल्ला विरोधकांनी केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले.
एस.डी. कॉर्पोरेशन या विकासक कंपनीला ताडदेवच्या एमपी मिल कम्पाउंडच्या एसआरए प्रकल्पात झोपडपट्टीवासीयांसाठी असलेला अतिरिक्त बांधकाम हक्क प्रकल्पग्रस्तांना हस्तांतरित करून देण्यासंबंधीचे हे प्रकरण आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय झाला असता तर त्यातून कंपनीला ५०० ते ८०० कोटी रुपयांचा फायदा झाला असता, असा आरोप आहे. या प्रकरणाच्या फाइलवर प्रकाश मेहता यांनी, ‘यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आहे’ असा शेरा लिहून पुढील कार्यवाहीसाठी फाइल खाली पाठवून दिली. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मुख्यमंत्र्यांना होती का, असा सवाल विरोधकांनी केला.

Web Title: Chief Minister's announcement; Investigation of Prakash Mehta's 'That' case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.