मुख्यमंत्री करणार अवयवदानाविषयी जनजागृती

By admin | Published: August 28, 2016 03:25 AM2016-08-28T03:25:55+5:302016-08-28T03:25:55+5:30

अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी राज्यभरात तीन दिवसीय ‘अवयवदान जनजागृती अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे. ३० आॅगस्ट रोजी मुंबई नरिमन पॉइंट येथून

Chief Minister's awareness about organism | मुख्यमंत्री करणार अवयवदानाविषयी जनजागृती

मुख्यमंत्री करणार अवयवदानाविषयी जनजागृती

Next

मुंबई : अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी राज्यभरात तीन दिवसीय ‘अवयवदान जनजागृती अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे. ३० आॅगस्ट रोजी मुंबई नरिमन पॉइंट येथून राज्यपाल विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘वॉकेथॉन’ने या अभियानाची सुरुवात होणार आहे.
येत्या ३०, ३१ आॅगस्ट, १ सप्टेंबर या तीन दिवसांत ‘महाअवयवदान जनजागृती अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे. ३० आॅगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता वॉकेथॉनची सुरुवात राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुभाष देसाई, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणार आहे. या ‘वॉकेथॉन’मध्ये शासकीय, निमशासकीय रुग्णालयांचे सर्व वरिष्ठ डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी संघटना आणि नागरिक सहभागी होणार आहेत.
याचबरोबरीने पुढील तीन दिवस राज्यस्तरावर, जिल्हा आणि तालुका पातळीवर विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत मुंबईमध्ये होणारे विविध कार्यक्रम जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्या अधिपत्याखाली होणार आहेत.
या अवयवदान चळवळीत सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. सर्व स्तरांत अवयवदानाविषयी जनजागृती व्हावी यासाठी कार्यशाळा, चर्चासत्र, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. अवयवदान चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी अवयवदात्यांच्या कुटुंबीयांचा गौरव करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

कुठे करू शकता नावनोंदणी?
अनेकांना अवयवदान करण्याची इच्छा असते. अवयवदान करण्यासाठी अवयवदानाची नोंदणी करणे आवश्यक आहे. आता एका क्लिकवर अवयवदानाची नावनोंदणी करणे शक्य आहे. अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती आणि वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत अवयवदानासाठी आॅनलाइन नावनोंदणी करण्यासाठी ६६६.ेिी१.ङ्म१ॅ या संकेतस्थळाला भेट देता येईल.

ब्रेनडेड रुग्णांच्या नातेवाइकांनी घ्यावा पुढाकार
मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा, १९९४मध्ये अंमलात आणल्यानंतर ११ हजार ३६४ मूत्रपिंड, ४६८ यकृत, १९ हृदय आणि ३ फुप्फुसांचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी ४५० ते ५०० इतकी नेत्र बुब्बुळे प्रत्यारोपित करून दृष्टिहीनांना दृष्टी देण्यात आली आहे.
मूत्रपिंडाचे आजार वाढत असून, मूत्रपिंडाची आवश्यकता अधिक आहे. राज्यात दर महिन्याला १ लाख २० हजार इतके डायलेसिस केले जाते. अवयवदानाचा टक्का वाढवण्यासाठी ‘बे्रनडेड’ व्यक्तींचे अवयव गरजू रुग्णांना उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे ब्रेनडेड रुग्णांच्या नातेवाइकांनीही पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याची माहिती डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.

Web Title: Chief Minister's awareness about organism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.