मंत्र्यांच्या भोजनावळीवर मुख्यमंत्र्यांचा बंदी आदेश

By Admin | Published: December 12, 2014 02:45 AM2014-12-12T02:45:50+5:302014-12-12T02:45:50+5:30

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेनाच्या काळात मंत्र्यांच्या बंगल्यावर होणा:या भोजनावळी, संगीताचे जलसे बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Chief Minister's ban order on ministers lunch | मंत्र्यांच्या भोजनावळीवर मुख्यमंत्र्यांचा बंदी आदेश

मंत्र्यांच्या भोजनावळीवर मुख्यमंत्र्यांचा बंदी आदेश

googlenewsNext
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेनाच्या काळात मंत्र्यांच्या बंगल्यावर होणा:या भोजनावळी, संगीताचे जलसे बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यात दुष्काळ असताना आपण स्वत: भोजनाचा कार्यक्रम आयोजित करणार नाही आणि तुम्हीही करू नका, असे त्यांनी सहकारी मंत्र्यांना बजावले आहे.
नागपूरमध्ये सध्या ब:यापैकी थंडी असल्याने साग्रसंगीत भोजनावळींस प्रारंभ झाला आहे. मंत्री, सचिव, अधिवेशन काळात दाखल झालेले लब्धप्रतिष्ठीत, उद्योजक, व्यावसायिक, पत्रकार आदींना निमंत्रित केले जाते. राज्यातील 19 हजारांहून अधिक गावात दुष्काळ असताना दिल्या जाणा:या भोजनावळी हा टीकेचा विषय होऊ शकतो, अशी भीती वाटल्याने हे आदेश दिल्याची चर्चा आहे.
 कामगार विभागाचे प्रधान सचिव अरविंद कुमार यांचे दारु पिऊन कर्मचा:यांना मारहाण करण्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. त्यात मंत्र्यांच्या भोजनावळीत असा एखादा प्रकार घडला तर आणखी नामुश्की होईल, अशी शंका वाटल्यानेही हे आदेश सुटल्याचे समजते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या तिरुपतीवारीवरील विमान खर्चाचा विषय चर्चेत आला.
 राज्यात दुष्काळ असताना भाजपाने एका मंत्र्याच्या विमानवारीवर खर्च का केला, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत केला. दीर्घ काळानंतर राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आल्याने नातलग, मित्रपरिवार, मतदारसंघातील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने नागपूरमध्ये आले आहेत. अशावेळी त्यांच्या सन्मानार्थ भोजनाचा कार्यक्रम केला नाही तर नाराजी व्यक्त होऊ शकते, अशी भीती एका शिवसेना मंत्र्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर व्यक्त केली. (विशेष प्रतिनिधी)

 

Web Title: Chief Minister's ban order on ministers lunch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.