मुख्यमंत्री साहाय्यता निधीत वाढ

By admin | Published: January 21, 2016 04:07 AM2016-01-21T04:07:47+5:302016-01-21T04:07:47+5:30

मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून रुग्णांवरील उपचारासाठी देण्यात येणाऱ्या मदतीत दुप्पट वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून त्याची घोषणा ते लवकरच करणार आहेत

Chief Minister's help fund raises | मुख्यमंत्री साहाय्यता निधीत वाढ

मुख्यमंत्री साहाय्यता निधीत वाढ

Next

यदु जोशी , मुंबई
मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून रुग्णांवरील उपचारासाठी देण्यात येणाऱ्या मदतीत दुप्पट वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून त्याची घोषणा ते लवकरच करणार आहेत.
लिव्हर ट्रान्सप्लांट, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट, कृत्रिम अवयव रोपण, नवजात अतिदक्षता विभागातील बालके यावरील उपचारासाठी पहिल्यांदाच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत सुरू करण्यात येणार आहे. सर्व प्रकारची मदत ही एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी असेल.
उपचारासाठी १ लाख रुपयांपर्यंत खर्च आल्यास आतापर्यंत २० हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री निधीतून दिली जायची. १ लाख ते ३ लाख पर्यंतच्या खर्चापोटी ३० हजार रुपये, ३ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंतच्या खर्चावर ४० हजार रुपये तर ५ लाख वा त्यापेक्षा अधिक अंदाजित खर्च असल्यास ५० हजार रुपयांपर्यंतचीच मदत दिली जात असे.

रुग्णालयाने दर्शविलेलाअसे मिळेल अर्थसहाय्य
अंदाजित खर्च(आकडे रुपयांमध्ये)
१) १० हजारमदत मिळणार नाही
२) १०,००१ ते एक लाखापर्यंतखर्चाच्या ५० टक्के अथवा
५०००० यापैकी कमी असलेली
३) १,००,००१ ते तीन लाखापर्यंतखर्चाच्या ५० टक्के अथवा
१००००० यापैकी कमी असलेली रक्कम
४) ३,००,००१ ते पाच लाखापर्यंतखर्चाच्या ५० टक्के अथवा रु. १५००००
यापैकी कमी असलेली रक्कम
५) पाच लाखापेक्षा जास्तदोन लाख रुपये
६) लिव्हर ट्रान्सप्लांट/बोन मॅरो
ट्रान्सप्लांट/हार्ट ट्रान्सप्लांट (अंदाजित
खर्च १०००००० वा त्यापेक्षा जास्त)तीन लाख रुपये
७) कृत्रिम अवयव रोपणासाठीअंदाजित खर्चाच्या ५० टक्के अथवा
एक लाखापैकी कमी असलेली रक्कम
८) नवजात अतिदक्षताअंदाजित खर्चाच्या ५० टक्के अथवा
विभागातील बालकेएक लाखापैकी कमी असलेली रक्कम

Web Title: Chief Minister's help fund raises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.