कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर व्याज न आकारण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 06:27 PM2018-02-08T18:27:32+5:302018-02-08T18:29:29+5:30
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या योजनेमधून कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर व्याज न आकारण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी बँकांना दिला.
मुंबई - महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या योजनेमधून कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर व्याज न आकारण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी बँकांना दिला. बँकांनी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर 31 जुलै 2017 पासूनचे व्याज आकारू नये, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी बँकांना केली आहे.
... clear circular be issued at the branch level conveying them not to charge any interest on the loan amount for this disbursal span period as agreed by all the banks in SLBC meeting.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 8, 2018
मुख्यमंत्र्यांनी आज शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. त्यावेळी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामधील माहिती जुळत असेल त्या खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम वळती करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
CM @Dev_Fadnavis asked to disburse the amount in next 3 days where account data is clear and matched.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 8, 2018
Process need to speed up in case of unmatched accounts & must be completed by 15th Feb and ...
शेतकऱ्यांनी अभूतपूर्व संप केल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र मोठा गाजावाजा झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठी पैशाची तरतूद असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात पात्र शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीचा लाभ अजून पोहोचलेला नाही.