मराठा आरक्षण मोर्चाकडे मुख्यमंत्र्यांची पाठ
By admin | Published: May 31, 2016 06:25 AM2016-05-31T06:25:14+5:302016-05-31T06:25:14+5:30
मराठा आरक्षणासाठी २ मे रोजी हिंगोली येथून सुरूवात झालेली मराठा आरक्षण जागर मोहीम सोमवारी मुंबईत येऊन धडकली.
मुंबई : मराठा आरक्षणासाठी २ मे रोजी हिंगोली येथून सुरूवात झालेली मराठा आरक्षण जागर मोहीम सोमवारी मुंबईत येऊन धडकली. मुंबईतील आझाद मैदानावर या मोहिमेचे रुपांतर धडक मोर्चात झाले. मात्र मुख्यमंत्र्यांनी या मोर्चाच्या शिष्टमंडळाला साधी भेटही दिली नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत बेमुदत उपोषण करण्याची घोषणा मोहिमेचे आयोजक मराठा जागर परिषदेने केली आहे.
मराठा जागर परिषदेचे अध्यक्ष संभाजी पाटील यांनी सांगितले की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ही मोहिम सुरू केली. समाजात जनजागृती व्हावी म्हणून गेल्या २९ दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांतून ही रॅली काढण्यात आली. दरम्यान राज्यातील विविध गावांत सभांचे आयोजन करण्यात आले. मंगळवारपासून परिषदेचे १००हून अधिक कार्यकर्ते आझाद मैदानात एकाचवेळी बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.