मुख्यमंत्र्यांचे खासगी फोटो ‘टिष्ट्वटर’वर
By admin | Published: July 10, 2015 03:30 AM2015-07-10T03:30:13+5:302015-07-10T03:30:13+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘फेसबुक’ अकाउंटमधील फोटो मिळवून त्याखाली अपमानास्पद मजकूर लिहून ते फोटो टिष्ट्वटरवर टाकण्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘फेसबुक’ अकाउंटमधील फोटो मिळवून त्याखाली अपमानास्पद मजकूर लिहून ते फोटो टिष्ट्वटरवर टाकण्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात एका इसमाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी संजय पांडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौटुंबिक फोटो अपमानास्पद मजकुरासह आपल्या मोबाइलवर पाहिले. हे फोटो अजय हातेवार नावाच्या एका इसमाच्या टिष्ट्वटर अकाउंटमध्ये होते. यासंदर्भात त्यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. या तक्रारीनुसार हातेवारविरोधात आयपीसी आणि आयटी अॅक्टनुसार संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष खानविलकर यांनी ‘लोकमत’ला दिली. या प्रकरणी सायबर सेल आणि ओशिवरा पोलीस चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी)