दौंडमधून बालिकेचे अपहरण
By admin | Published: September 24, 2016 01:24 AM2016-09-24T01:24:09+5:302016-09-24T01:24:09+5:30
दौंड रेल्वे स्टेशन परिसरातून चार वर्षांच्या बालिकेचे अपहरण करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.
दौंड : दौंड रेल्वे स्टेशन परिसरातून चार वर्षांच्या बालिकेचे अपहरण करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.
शंभूश्री साधा (वय ५५), त्यांची पत्नी इनरबत्तीदेवी (वय ५0), मुलगा श्रीकांत (वय ८) आणि चार वर्षांची अल्पवयीन नात हे सर्व बिहार येथे आपल्या गावी निघाले होते. सदरचे दांपत्य बोरी (ता. इंदापूर) येथे मोलमजुरी करतात. हे कुटुंब दौंड रेल्वे स्टेशनच्या बंगलासाईट या भागाकडील रेल्वे तिकीट कार्यालयाजवळ आले. साधारणत: त्यांना रात्री १0 वाजता रेल्वेगाडी होती. त्यामुळे रेल्वेच्या परिसरात ते वेळ घालवत होते. या कुटुंबीयाबरोबर बिहारचे दोन युवक होते. रात्री ८ च्या सुमारास हे युवक रिचार्ज करण्यासाठी गावात आले. तर शंभूश्री आणि त्यांची पत्नी इनरबत्तीदेवी हे दोघे चहा पिण्यासाठी चहाच्या गाड्याकडे गेले.
दरम्यान, ८ वर्षांचा श्रीकांत व अल्पवयीन चार वर्षांची मुलगी दोघे तिथेच थांबले. थोड्या वेळातच एक अज्ञात युवक आला. त्याने मुलीला पळवून नेले. तिला मोटरसायकलवर बसवून पसार झाला. त्यानंतर चहा पिऊन शंभूश्री आणि त्यांची
पत्नी आल्यानंतर श्रीकांत जोरजोरात रडत होता. (वार्ताहर)