सहा वर्षांपासून मुलांना केले कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2017 04:00 AM2017-01-20T04:00:47+5:302017-01-20T04:00:47+5:30

तीन लहान मुलांना रिक्षाचालक बापाने सहा वर्षापासून आपल्या घरातच कैद करून अज्ञातवास घडविल्याचे प्रकरण माजी नगरसेविकेने उघडकीस आणले

Child ban imposed for six years | सहा वर्षांपासून मुलांना केले कैद

सहा वर्षांपासून मुलांना केले कैद

Next


भिवंडी : खेळण्याबागडण्याचे वय असलेल्या तीन लहान मुलांना रिक्षाचालक बापाने सहा वर्षापासून आपल्या घरातच कैद करून अज्ञातवास घडविल्याचे प्रकरण माजी नगरसेविकेने उघडकीस आणले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
शहरातील कोटरगेट मशिदीसमोर असलेल्या लंबीचाळमध्ये शफिक मोमीन आपल्या परिवारासह राहत होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तो तिला मारहाण करीत असल्याने त्याच्या जाचाला कंटाळून २०१० मध्ये त्याची पत्नी सोडून गेली, तेव्हापासून त्याने या तीन मुलांचा समाजाशी संपर्क होऊ नये म्हणून त्यांना शाळेत जाण्यास मनाई केली. त्यांना घरातच बंदी बनवून ठेवले. रात्रंदिवस घरासमोर रहदारी सुरू असतानाही या मुलांची घराबाहेर पडण्याची हिंमत झाली नाही. गेल्या महिन्यापासून याबाबतची माहिती माजी नगरसेविका रूख्साना कुरेशी यांना मिळाली होती. त्यांनी सर्व माहिती घेत परिसरातील नागरिकांना सोबत बुधवारी रात्री १२ च्या सुमारास घरात घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या मुलांची सुटका केली. त्यांना उपचारासाठी इंदिरा गांधी रूग्णालयात दाखल केले.
रेय्यान (१५), अय्यन (१३), मोहम्मद (१०) अशी या मुलांची नावे आहेत. त्यांचे शिक्षणही सहा वर्षापासून बंद करून खुराड्याप्रमाणे असलेल्या खोलीत डांबून ठेवले होते. त्यापैकी मोठा मुलगा रेय्यान याचा पाय एक महिन्यापूर्वी फ्रॅक्चर झाला. त्याच्या पायावर प्लास्टर करण्यात आले. तसेच छोटा मुलगा मोहम्मदही लंगडत असल्याने त्यांचे एक्स-रे काढले आहेत. मात्र फ्रॅक्चर कशामुळे झाले हे त्यांनी सांगितले नाही. इंदिरा गांधी रूग्णालयातील डॉक्टरांनी मुले घाबरलेल्या स्थितीत असून त्यांची स्थिती बापाच्या विरोधात बोलण्यापलिकडे आहे. तसेच त्यांच्या शरीरात रक्ताची-कॅल्शियमची कमतरता असल्याचे सांगितले.
या प्रकरणी कुरेशी यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस जबाब नोंदवत आहे. मात्र अद्याप बापाविरूद्ध गुन्हा दाखल केलेला नाही. या घटनेविरोधात परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
(प्रतिनिधी)
>पत्नी पळवेल ही भीती
तिन्ही मुलांना पत्नी पळवून नेईल या भीतीने त्यांना घरात ठेवल्याचे शफीक मोेमीन याने कबूल केले. यामुळे मुलांना शाळेत किंवा बाहेर पाठविले नसल्याचे सांगितले.

Web Title: Child ban imposed for six years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.