बालकाचा खून करुन आईने केली आत्महत्या
By admin | Published: October 12, 2015 01:46 AM2015-10-12T01:46:03+5:302015-10-12T01:46:03+5:30
सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या एका महिलेने आपल्या पाच वर्षीय मुलाचा खून करून स्वत: इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली
पुणे/सिंहगड रस्ता : सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या एका महिलेने आपल्या पाच वर्षीय मुलाचा खून करून स्वत: इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. माणिकबागेतील निखिल गार्डन सोसायटीमध्ये सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. कौटुंबिक भांडणातून तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
दीप्ती तेजस मोरे (वय ३४, रा. निखिल गार्डन सोसायटी, माणिकबाग) या महिलेने आत्महत्या केली आहे. अर्णव (वय ५) असे खून केलेल्या मुलाचे नाव आहे. सिंहगड रोड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या पती-पत्नीमधील घरगुती भांडणातून दीप्तीने हे दुर्दैवी पाऊल उचलले आहे. या प्रकाराने माणिकबाग परिसरात एकच खळबळ उडाली. आज सकाळी साधारण साडेसातचे सुमारास हा प्रकार घडला. दीप्तीने काही दिवसांपूर्वी आयटी कंपनीतील नोकरी सोडली होती. तर तेजसही आयटी कंपनीत नोकरीला होता.
रविवारी सकाळी तेजस तोंड धुवत असताना दीप्ती त्याच्याजवळ आली. ‘अपेक्षा पूर्ण होत नसल्याने मी अर्णवला मारून टाकले आहे. आता मलाही राहायचे नाही’ असे तेजसला सांगून ती घराबाहेर पळून गेली. घराचे बाहेरून दार बंद करत तिने टेरेसवर जाऊन खाली उडी मारली. तिने उडी मारल्याचे समजताच इमारती खाली लोक जमा झाले असतानाच तिचा पती तेजसने आरडा-ओरड करत घराचा दरवाजा उघडण्यासाठी मदत मागितली व त्यांनी फ्लॅटची चावी खाली टाकली़ लोकांनी इमारतीत येऊन त्यांच्या घराचा दरवाजा उघडला आणि सर्वांनाच दुसरा धक्कादायक प्रकार समोर पहावयास मिळाला तो म्हणजे याच घरात अर्नव या त्यांच्या पाच वर्षांचे मुलाचे हाताची नस कापुन व त्याचा गळा आवळून खून झाल्याचे समोर दिसले. पत्नीनेच मुलाचा गळा दाबून खून केल्याचे तेजसने या वेळी सांगितले. मुलगा अर्णव हा श्रीरविशंकर आर्ट आॅफ लिव्हींग या शाळेत केजीत शिकत होता. दीप्तीने पती-पत्नीच्या भांडणातून मुलगा अर्णवचा खून करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अर्णवचा गळा दाबून खून करेपर्यंत पतीला हा प्रकार कसा समजला नाही की पतीला एका रुममध्ये कोंडून तिने अर्णवला मारले हे समजले नाही. घटनेनंतर तेजस यांना मानसिक धक्का बसल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात
आले होते.
घटनास्थळी पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, सहायक आयुक्त मिलिंद मोहिते, वरिष्ठ निरीक्षक श्रीनिवास मुंढे यांनी येऊन पाहणी केली. घरात दीप्तीने लिहिलेली
चिठ्ठी सापडली आहे. तिने मुलाच्या हाताच्या नसा कापल्या असून गळ््यावरही काही खुणा आहेत. घरगुती वादातून तिने हे कृत्य केले असावे, अशी शक्यता असल्याचे डॉ. पठारे यांनी सांगितले.
वाढदिवस ठरला घातदिवस
रविवारी दीप्तीचा वाढदिवस होता. त्यामुळे तिचा वाढदिवस मुलगा अर्णव व तिच्यासाठी घातदिवस ठरला. तिने आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर आलेले नातेवाईक तिचा रविवारी वाढदिवस असल्याचे सांगत होते. वाढदिवसादिवशीच हे का केले, असे म्हणून तिची आई
रडत होती, असे तेथील एका नागरिकाने सांगितले.