गडचिरोलीत बालमृत्यू वाढले

By admin | Published: December 1, 2015 03:28 AM2015-12-01T03:28:56+5:302015-12-01T03:28:56+5:30

बालमृत्यू रोखण्यासाठी शासन नवनवीन कार्यक्रम आखून त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे. तरीही गेल्या चार वर्षांत बालमृत्यू रोखण्यात शासनाला म्हणावे तितके यश आलेले नाही.

Child death in Gadchiroli increased | गडचिरोलीत बालमृत्यू वाढले

गडचिरोलीत बालमृत्यू वाढले

Next

- सुमेध वाघमारे,  नागपूर
बालमृत्यू रोखण्यासाठी शासन नवनवीन कार्यक्रम आखून त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे. तरीही गेल्या चार वर्षांत बालमृत्यू रोखण्यात शासनाला म्हणावे तितके यश आलेले नाही. आरोग्य सेवा, नागपूर मंडळांतर्गत येणाऱ्या सहा जिल्'ात एक ते पाच वर्षे वयोगटातील बालमृत्यूमध्ये केवळ १३.२८ टक्के घट झाली आहे. मात्र, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्'ात शून्य ते एक वर्षांतील बालमृत्यूंमध्ये वाढ झाल्याचे धक्कादायक चित्र आहे.
शासनाने बालमृत्यू कमी करण्यासाठी नवसंजीवनी योजना, जननी सुरक्षा योजना, जेएसएसके योजना, १०८ अ‍ॅम्ब्युलन्सची सेवा, मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत लसीकरणाची सेवा, ग्रामीण स्वास्थ मिशन, एनएचएम अंतर्गत मोबाइल मेडिकल युनिट सेवा व मानवविकास कार्यक्रम कार्यान्वित आहेत. यात गर्भवती मातांना अनुदान, त्यांची तपासणी, स्तनदा मातांची तपासणी व शून्य ते सहा महिने बालकांची मोफत तपासणी, औषध व प्रवासही दिला जातो. यावर वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत, असे असतानाही अपेक्षित यश मिळत नसल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

२०६६ बालमृत्यूू
- आरोग्य सेवा मंडळ, नागपूर अंतर्गत नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा हे सहा जिल्हे येतात. शून्य ते एक वर्ष वयोगटात २०११-१२मध्ये भंडाऱ्यात ३८१, गोंदियात ४३६, चंद्रपूरात ७०२, गडचिरोलीत ४२६, वर्धेत ३८२ तर नागपूर जिल्'ात २४० असे मिळून २५६७ बालकांचा मृत्यू झाला.
याच्या तुलनेत २०१४-१५मध्ये भंडाऱ्यात ४३४, गोंदियात ४८५, चंद्रपूरमध्ये १५०, गडचिरोलीत ५९८, वर्धेत २२५ तर नागपूर जिल्'ात १७४ असे मिळून २०६६ बाल मृत्यू झाले आहेत. यात चंद्रपूर, वर्धा व नागपुरात बालमृत्यूदर कमी झाला असला तरी गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्'ात तो वाढला आहे.

जिल्हानिहाय बालमृत्यू
जिल्ह्याचे नाव२०११-१२२०१२-१३२०१३-१४२०१४-१५
भंडारा३८१५१८४५३४३४
गोंदिया४३६४२२५१७४८५
चंद्रपूर ७०२६०९४५११५०
गडचिरोली४२६५८७५१२५९८
वर्धा३८२३५५२६३२२५
नागपूर २४०१६११२९१७४

Web Title: Child death in Gadchiroli increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.