मुलानेच केला जन्मदात्याचा खून

By admin | Published: July 21, 2016 10:04 PM2016-07-21T22:04:16+5:302016-07-21T22:04:16+5:30

घरातील संपत्तीचा वाद विकोपाला गेला असताना राग अनावर झाल्याने पोटच्या मुलाने ६५ वर्षीय जन्मदात्या पित्याच्या गुप्तांगावर लाथांनी वार करून बुधवारी सकाळी जखमी केले.

The child has borne the murderer | मुलानेच केला जन्मदात्याचा खून

मुलानेच केला जन्मदात्याचा खून

Next

ऑनलाइन लोकमत

आष्टी (गडचिरोली) : घरातील संपत्तीचा वाद विकोपाला गेला असताना राग अनावर झाल्याने पोटच्या मुलाने ६५ वर्षीय जन्मदात्या पित्याच्या गुप्तांगावर लाथांनी वार करून बुधवारी सकाळी जखमी केले. त्यानंतर उपचाराअभावी पित्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ७ वाजता आष्टी परिसरातील प्रियदर्शनी येथे घडली.
बोंदिका आशन्ना पोरेते असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. आष्टीपासून २५ किमी अंतरावर असलेल्या प्रियदर्शनी येथील बोंदिका आशन्ना पोरेते यांना दोन मुले व एक मुलगी आहे. बोंदिका पोरेते यांच्या पत्नीला भावाकडून संपत्तीचा काही हिस्सा प्राप्त झाला होता. परंतु सदर हिस्सा आपल्याला न देता केवळ आपल्या मोठ्या भावाला का दिला जात आहे. हिस्से करताना आपल्याशी दुजाभाव होत असल्याच्या भावनेतून आरोपी शिवराम बोंदिका पोरेते (४५) याने बुधवारी सकाळी वडील बोंदिका पोरेते यांच्या शरीरावर व गुप्तांगावर लाथाबुक्यांनी वार केला. दिवसभर वडिलांना शिवरामने मारझोड केली. त्यामुळे बोंदिका पोरेते यांना अंतर्गत जबर दुखापत झाली. शेवटी वेदना असह्य झाल्याने बोंदिका पोरेते यांचा गुरूवारी सकाळी ७ वाजता घरीच उपचाराअभावी मृत्यू झाला. सदर घटनेची तक्रार गावातच घराशेजारी राहणाऱ्या बोंदिका पोरेते यांच्या ३८ वर्षीय मुलीने आष्टी पोलीस ठाण्यात गुरूवारी दाखल केली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून शिवराम पोरेते याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंगटे, सहायक पोलीस उपनिरीक्षक शरद पोटवार, मिलींद एलावार करीत आहेत.

उपचाराअभावी बोंदिका रात्रभर विव्हळला
प्रियदर्शनी येथे बुधवारी बोंदिका पोरेते यांचा लहान मुलगा शिवराम पोरेते याने बोंदिका यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. सदर मारहाण एवढी जबर होती की, बोंदिका दिवसभर विव्हळला तरीही कुटुंबातील कोणत्याच सदस्याने बोंदिकाला उपचारासाठी दवाखान्यात हलविले नाही, अथवा घरी डॉक्टरला बोलाविले नाही. दिवसानंतर रात्रभरही बोंदिका लाथाबुक्यांच्या माराने विव्हळत राहिला. शेवटी गुरूवारी सकाळी ७ वाजता वेदना असह्य झाल्याने बोंदिकाने प्राण सोडला. यापूर्वीही संपत्तीच्या वादातून शिवराम पोरेते हा वडिलांशी वाद घालून त्यांना नेहमीच मारहाण करायचा. परंतु याची कुठेही वाच्यता होत नव्हती

Web Title: The child has borne the murderer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.