‘बालहक्क’ एकतर्फी!

By admin | Published: July 18, 2014 03:01 AM2014-07-18T03:01:12+5:302014-07-18T03:01:12+5:30

बारा वर्षांखालील बालगोविंदांना दहीहंडीच्या थरावर चढविल्यास दहीहंडी उत्सव मंडळांवर बालहक्क समितीने कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत

'Child rights' one way! | ‘बालहक्क’ एकतर्फी!

‘बालहक्क’ एकतर्फी!

Next

मुंबई : बारा वर्षांखालील बालगोविंदांना दहीहंडीच्या थरावर चढविल्यास दहीहंडी उत्सव मंडळांवर बालहक्क समितीने कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. मात्र हा निर्णय एकतर्फी घेण्यात आल्याची टीका दहीहंडी मंडळांकडून करण्यात येत असून, याबाबत आयोजकांनी मात्र सावध भूमिका बाळगली आहे.
बालहक्क समितीने घेतलेला हा निर्णय एकतर्फी असून, याबाबत गोविंदा पथकांची बाजूच ऐकण्यात आलेली नाही. बालहक्क समितीला जेवढी बालगोविंदांची काळजी आहे, त्याप्रमाणेच गोविंदा पथकेही बालगोविंदांच्या सुरक्षेचा विचार नेहमीच करतात. शिवाय, या उत्सवाच्या माध्यमातून बालगोविंदांना वेगळीच प्रेरणा मिळते. मात्र याविषयी, बालहक्क समितीशी आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही आमची बाजू न ऐकताच हा निर्णय घेण्यात आल्याचे माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रशिक्षक अरुण पाटील यांनी सांगितले.
दहीहंडी उत्सवापूर्वी पुन्हा
एकदा या मुद्द्यावर सर्व गोविंदा पथकांची बैठक घेण्यात येईल. त्यानंतर या बैठकीत चर्चा करून गोविंदा पथके त्यांची भूमिका स्पष्ट करतील. दहीहंडी समन्वय समितीच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात येईल. त्याचबरोबर पुन्हा एकदा गोविंदा पथकांची बाजू शासनाला समजावून सांगण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येतील. मात्र या निर्णयामुळे दहीहंडी उत्सवाच्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेला गालबोट लागले आहे, असे मत श्री दत्त गोविंदा पथकाचे प्रशिक्षक बाळा पडेलकर यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Child rights' one way!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.