बालकांच्या लसीकरणाची माहिती एका क्लिकवर, लसीकरणातून एकही बाळ सुटणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 09:17 PM2017-10-05T21:17:07+5:302017-10-05T21:17:25+5:30
जन्मताच आधार कार्ड हाती पडेल अशी केंद्र सरकारची योजना आहे. यावर राज्यात अनेक ठिकाणी अंमल सुरू झाले आहे. त्याच धर्तीवर बालकांचे पोर्टल एन्ट्री ट्रॅकिंग सिस्टीम सुरू करून आधार कार्डशी जोडण्याचाही विचार आहे.
मुंबई- जन्मताच आधार कार्ड हाती पडेल अशी केंद्र सरकारची योजना आहे. यावर राज्यात अनेक ठिकाणी अंमल सुरू झाले आहे. त्याच धर्तीवर बालकांचे पोर्टल एन्ट्री ट्रॅकिंग सिस्टीम सुरू करून आधार कार्डशी जोडण्याचाही विचार आहे. त्यामुळे प्रत्येक बाळाच्या जन्मापासून त्याला देण्यात आलेल्या लसींची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल, असा विश्वास पालिकेच्या आरोग्य खात्याने व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारच्या इंद्रधनुष्य मोहिमेंतर्गत 9 ते 16 ऑक्टोबर रोजी लसीकरणाची इंद्रधनुष ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात मुंबईत एक लाख 75 हजार 877 बालके असल्याचे आढळून आले. त्यापैकी 964 बालकांनी लसीकरणाचा डोस घेतला नसल्याचे समोर आले आहे अशी माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रशेखर चिपळूणकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
या मोहिमेंतर्गत तीन हजार 700 आरोग्य सेविकांच्या
माध्यमातून शहर आणि उपनगरातील गर्भवती महिला व दोन वर्षांपर्यंतच्या बालकांचे लसीकरण केले जाते. त्यासाठी झोपडपट्टी, बांधकामांचे ठिकाणं, आदिवासी पाडे, डोंगराळ भाग आदी ठिकाणी घरोघरी जावून सर्वेक्षण केले जाते अशीही माहिती त्यांनी दिली.
असा तयार होईल रेकॉर्ड
केंद्राच्या नवीन नियमानुसार बालक जन्मताच त्याचे आधार कार्ड काढले जात आहे. त्यानंतर पार्टल एन्ट्री ट्रॅकींग सिस्टिम आधार कार्डशी जोडण्यात येईल. केंद्राची परवानगी मिळाल्यास मुंबईतही यावर अंमल होईल. त्यामुळे एका क्लिकवर बालकाच्या आरोग्याचा संपूर्ण तपशील उपलब्ध होईल. आधार कार्डच्या मदतीने बाळाच्या आरोग्याचा तपशील सहज उपलब्ध होईल.