मूल होत नसल्याने चिमुकलीचे अपहरण

By admin | Published: April 25, 2015 09:43 AM2015-04-25T09:43:21+5:302015-04-25T09:43:34+5:30

मातृत्वाची ओढ लागलेल्या पण पदरा मूल नसल्यामुले निराश झालेल्या एका महिलेने चार महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून आपली मुलगी म्हणून घरी नेल्याची घटना मुंबईत घडली.

Childbirth kidnapping | मूल होत नसल्याने चिमुकलीचे अपहरण

मूल होत नसल्याने चिमुकलीचे अपहरण

Next

 महिलेस अटक : चोवीस तासांत तपास

मुंबई : मातृत्वाची ओढ लागलेल्या पण पदरा मूल नसल्यामुले निराश झालेल्या एका महिलेने चार महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून आपली मुलगी म्हणून घरी नेल्याची घटना मुंबईत घडली आहे.  मात्र मुलगी गायब झाल्याची तक्रार पालकांनी नोंदवल्यानंतर पोलिसांनी अवघ्या २४ तासांतत्या मुलीला शोधण्यात यश मिळवले असून आरोपी महिलेला अटक केली.
२३ एप्रिल रोजी रात्री कल्याण येथे राहणारे अब्दुल करीम हे आपली पत्नी आणि दोन लहान मुलींसह सीएसटी स्थानकाच्या मेन लाइन हॉल येथे झोपले असता त्याच्या चार महिन्यांच्या अरीजा या मुलीला पळवून नेण्यात आले. सकाळी याची माहिती त्यांनी तत्काळ सीएसटी रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर शोध घेण्याचे काम रेल्वे पोलिसांकडून सुरू करण्यात आले. सीसीटीव्ही फूटेज तपासल्यावर सीएसटी स्टेशन येथे येणार्‍या टॅक्सीतून एका महिलेने या मुलीला नेल्याचे समजले. त्यानंतर टॅक्सीचालकाकडे चौकशी केली असता मानखुर्द येथे एका महिलेला लहान मुलासह सोडल्याचे चालकाने सांगितले. ज्या ठिकाणी महिलेला सोडले त्या ठिकाणी अनेक इमारती असल्याने तिचा शोध घेणे जिकिरीचे काम होते. मात्र पोलिसांनी प्रत्येक रूमची तपासणी केल्यानंतर एक महिला प्रसूत झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या महिलेच्या घरात जाऊन पोलिसांनी चौकशी केली. महिला आरोपीने तिला मुलगा झाला असून, तो पाळण्यात झोपल्याचे सांगितले. त्याची पोलिसांनी खात्री केली असता तो मुलगा नसून मुलगी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सखोल चौकशी केली असता आरोपी महिलेकडून गुन्ह्याची कबुली देण्यात आली. 
या घटनेचा रेल्वे पोलिसांनी २४ तासांत छडा लावल्याचे जीआरपी आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप आयुक्त रूपाली अंबुरे, सीएसटी स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे, पोलीस निरीक्षक माणिक साठे, पोलीस निरीक्षक योगेंद्र पाचे, पोलीस हवालदार गावकर, पोलीस शिपाई साळवी, पोलीस शिपाई हिरनाक यांच्यासह अन्य पोलिसांनी केली. (प्रतिनिधी) गरोदर असल्याचे भासवून पतीला फसवत होती
नऊ महिने गरोदर असल्याचे भासवून महिला आरोपी आपल्या पतीलाही फसवत होती. ही महिला पोटाला पट्टे बांधून गरोदर असल्याचे पतीला भासवत होती. सीएसटी येथून चार महिन्यांच्या मुलीला पळवून नेल्यानंतरही पतीला व तिच्या शेजार्‍यांना मुलगा झाल्याचे सांगून त्याबाबत विधी करून जेवणावळही आयोजित केली होती, असे जीआरपी आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी सांगितले. पळवून नेण्यात आलेल्या मुलीला २४ तासांमध्ये शोधण्याची कामगिरी पोलिसांनी केली.

Web Title: Childbirth kidnapping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.