'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवणारा बालपुढारी

By admin | Published: January 14, 2016 05:03 PM2016-01-14T17:03:38+5:302016-01-14T17:28:23+5:30

असं म्हणतात की ग्रामीण भागात मुलांना बालपणीच राजकारणाचं बाळकडू मिळतं त्याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या व्हॉट्सअपवर व्हायरल झाला आहे.

Childhood dreaming of a 'good day' | 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवणारा बालपुढारी

'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवणारा बालपुढारी

Next

बालपुढाऱ्याची राजकीय फटकेबाजी, व्हिडीओ झाला व्हायरल
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर , दि. १४ - असं म्हणतात की ग्रामीण भागात मुलांना बालपणीच राजकारणाचं बाळकडू मिळतं त्याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या व्हॉट्सअपवर व्हायरल झाला आहे. ज्या वयात मुलांना खेळणं आणि बागडणं यापलिकडे काही माहीत नसतं त्या वयात हा मुलगा अच्छे दिनाच्या गोष्टी करत. राजकीय नेत्याप्रमाणे गप्पा मारताना दिसतो आहे.
सत्ता कोणाचीही असो विकास झाला पाहिजे, सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी करावी. भ्रष्ट्राचार वाढतच चालला आहे. शेतकऱ्याकडून १० रुपयांची घेतलेली वस्तू २० रुपयात विकली जाते आहे. अशा अनेक बाबींवर हा छोटा पुढारी बोलला आहे,
या छोट्या पुढाऱ्याला प्रथम आपल्या गावचा विकास करायचा आहे, सध्या त्याच्या गावात सत्तेत असणाऱ्या पुढाऱ्यांबद्दल त्याला कोणत्याही तक्रारी नाहीत. त्याला गावातील सर्व रस्ते बांधायचे आहेत.

 

 श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथे चौथीत शिकणारा घनशाम दरोडे याचा व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झालेल्या व्हिडीओत राजकीय फटकेबाजी करत राजकीय नेत्यांना सल्ला देताना दिसतो आहे.
भविष्यात आपल्याला जिल्हाधिकारी होऊन सुधारणा करायच्या आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करायचं असंही घनश्याम सांगतो. शेतकरी आत्महत्या, वीज, शेतमालाचा दर, शैक्षणिक धोरण अशा अनेक विषयावर त्यानं फटेकबाजी केली आहे.

 

Web Title: Childhood dreaming of a 'good day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.