काडतुसे शोधण्यास मुलांना जुंपले

By admin | Published: June 27, 2014 12:31 AM2014-06-27T00:31:16+5:302014-06-27T00:31:16+5:30

येथील रेल्वे स्थानकाच्या पुढे दिल्ली-चेन्नई मार्गावर दोन ट्रॅकच्या मधोमध असलेल्या नाल्यात गेल्या चार दिवसापासून मोठ्या प्रमाणावर काडतुसे सापडत आहेत. ही काडतुसे शोधण्यासाठी पोलिसांनी चक्क

Children are bound to find cartridges | काडतुसे शोधण्यास मुलांना जुंपले

काडतुसे शोधण्यास मुलांना जुंपले

Next

चंद्रपुरातील प्रकार : मजुरीपोटी पहिल्या दिवशी दिले ७० रुपये
चंद्रपूर : येथील रेल्वे स्थानकाच्या पुढे दिल्ली-चेन्नई मार्गावर दोन ट्रॅकच्या मधोमध असलेल्या नाल्यात गेल्या चार दिवसापासून मोठ्या प्रमाणावर काडतुसे सापडत आहेत. ही काडतुसे शोधण्यासाठी पोलिसांनी चक्क अल्पवयीन मुलांना जुंपल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे. सूरज बत्तलवार (१७) व मो.सय्यद (१४) अशी या मुलांची नावे आहेत. सूरज हा नवव्या वर्गात शिकत असून मो.सय्यद आठवीचा विद्यार्थी आहे.
२२ जूनला दुपारी हे दोघे या नाल्यात मासे पकडत असताना त्यांच्या हाती काही काडतुसे लागली होती. त्यांनी याबाबत जवळच्या पानटपरी चालकाला सांगितले. त्यानंतर पोलिसांनी या नाल्यात शोधमोहिम सुरू केली. त्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेण्यात आले. मात्र त्यांच्यासोबत पोलिसांनी या दोघांनाही शोध कामात जुंपले. गेल्या चार दिवसांपासून ही दोन्ही मुले काडतूसे शोधण्याच्या कामी आहेत. पहिल्या दिवशी पोलिसांकडून मजुरीपोटी आम्हाला केवळ ७० रुपये देण्यात आले, असे या मुलांनी सांगितले. त्यानंतर मात्र काम पूर्ण झाल्यानंतर पूर्ण पैसे देऊ, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे २६ जूनला पहिल्या दिवशी दोघेहीे शाळेत जाऊ शकली नाही. एकीकडे अल्पवयीन मुलांना कामावर जुंपण्यात येऊ नये, असा कायदा असताना कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनीच हा कायदा मोडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी चौकशी करण्याचे संकेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. त्यामुळे आता याप्रकरणी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Children are bound to find cartridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.