आईचे छत्र हरवल पण माणुसकीचे छत्र सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 07:20 PM2018-09-17T19:20:19+5:302018-09-17T19:22:58+5:30

नक्षलींशी निधड्या छातीने लढताना सात वर्षांपूर्वी वीरगती प्राप्त झालेल्या अनिल वाघाडे या सीआरपीएफ जवानाच्या पत्नीचा रविवारी मृत्यू झाला.

children got help by people after death of mother | आईचे छत्र हरवल पण माणुसकीचे छत्र सापडले

आईचे छत्र हरवल पण माणुसकीचे छत्र सापडले

Next

तळेगाव स्टेशन : नक्षलींशी निधड्या छातीने लढताना सात वर्षांपूर्वी वीरगती प्राप्त झालेल्या अनिल वाघाडे या सीआरपीएफ जवानाच्या पत्नीचा रविवारी मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह मूळ गावी यवतमाळ येथे नेण्यासाठी शववाहिनी किंवा रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे मातापित्यांचे छत्र हरपलेल्या दोन्ही मुलांना खेदजनक प्रसंगाला  सामोरे जावे लागले. सीआरपीएफ कॅम्पमधील महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीमुळे या वीरपत्नीवर तिच्या गावी अंत्यसंस्कार करता आले.


         वाघाडे यांच्या पत्नी कल्पना येथील डॉ भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत्या. त्यांचा रविवारी रात्री आजारपणामुळे मृत्यु झाला.  मृतदेह त्यांच्या गावी यवतमाळ येथे नेण्यासाठी मुलांकडे पैसे नव्हते. नातेवाईकांचीही मदत मिळाली नाही. ६५० किमी दूर अंतरावरील यवतमाळ गावी करण्यासाठी शववाहिनी किंवा रुग्णवाहिका मिळत नव्हती. आईच्या मृत्यूच्या बातमीने धक्का बसलेल्या तिच्या दोन्ही मुलांना काय करावे समजत नव्हते, तेंव्हा काही विद्यार्थी मित्र मदतीला धावून आले. महिलांनी पुढाकार घेत एकत्र येऊन मृत वीर जवानपत्नीच्या जीवनाच्या अखेरच्या प्रवासाची व्यवस्था केली. तसेच नगरसेवक बापुसाहेब भेगडे यांनी दवाखान्याचे पैसे भरण्याची जबाबदारी घेत, नगरसेवक सुनील शेळके आणि सीआरपीएफ मधील महिलांनी आर्थिक मदत केली. वीरजवानाच्या पत्नीला त्यांच्या मूळ गावी अखेरचा निरोप दिला.

Web Title: children got help by people after death of mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.