प्रेम प्रकरणातून मुलं कमी वयातच सोडताहेत घर; पळून जाणाऱ्यांचा आकडा पाहून चक्रवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 01:32 PM2023-07-15T13:32:35+5:302023-07-15T13:33:00+5:30

काबाडकष्ट करून वाढवणाऱ्या आई-वडिलांपेक्षा सध्या मुला-मुलींना आभासी जगातील मित्र, मैत्रिणी, प्रियकर अधिक महत्त्वाचे वाटू लागले आहेत.

Children leave home at a young age due to love affairs; Know the numbers | प्रेम प्रकरणातून मुलं कमी वयातच सोडताहेत घर; पळून जाणाऱ्यांचा आकडा पाहून चक्रवाल

प्रेम प्रकरणातून मुलं कमी वयातच सोडताहेत घर; पळून जाणाऱ्यांचा आकडा पाहून चक्रवाल

googlenewsNext

विजयकुमार सैतवाल

जळगाव : नोकरी अथवा अन्य व्यवसायामुळे आई-वडील दिवसभर घराबाहेर राहतात, त्यामुळे शाळेनंतर मुलांचा बहुतांश वेळ सोशल मीडियावर जातो व त्यातून कोणत्यातरी अपरिचितांशी ओळख होते. काही दिवसांच्या ओळखीनंतर मुले-मुली घर सोडतात व ते रफू चक्कर होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यात अल्पवयीन मुलींसह मुलांचाही समावेश आहे. मात्र मुलींची संख्या तर कितीतरी पटीने अधिक आहे. गेल्या अडीच वर्षात एक दोन नाही तर तब्बल ५०१ मुला-मुलींनी घर सोडले. यात ८० टक्के मुली आहेत. २०२३ च्या जूनपर्यंतच १४३ मुला- मुलींनी घर सोडले. त्यात १२६ मुली असल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या अहवालातून समोर आली आहे. 

काबाडकष्ट करून वाढवणाऱ्या आई-वडिलांपेक्षा सध्या मुला-मुलींना आभासी जगातील मित्र, मैत्रिणी, प्रियकर अधिक महत्त्वाचे वाटू लागले आहेत. यात सर्वाधिक प्रमाण मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे आहे. 

शोधणे आव्हान

पोलिस ठाण्यात चार महिन्यांत शोध लागला नाही तर तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे (एएचटीयू) दिला जातो. २०२१ मध्ये पळविलेल्या एकूण २०९ मुला-मुलींपैकी एएचटीयू विभागाने १९४ मुला-मुलींचा शोध लावला. तर २०२२ मध्ये २३४ पैकी १८८ मुला-मुलींचा शोध या कक्षाने लावला आहे. अशा मुला-मुलींना शोधण्याचे असते. 

तीन वर्षांत २०२३ च्या सहा महिन्यांत सर्वाधिक

गेल्या तीन वर्षामध्ये २०२३ च्या जानेवारी ते जूनमध्ये मुले पळून जाण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. २०२१ मध्ये ३०, २०२२मध्ये ३८ मुले पळाली होती. या सहा महिन्यात १७ मुले पळाली आहे. दुसरीकडे २०२१मध्ये एकूण १७९, २०२२मध्ये १९६ मुले पळून गेले तर २०२३च्या सहाच महिन्यात १२६ मुली पळून गेल्या आहे. अल्पवयीन असल्याने यात भादंवि ३६३ नुसार त्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होऊन उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे तपास दिला जातो.

५८ मुला-मुलींचा शोध सुरु २०२३ मध्ये जानेवारी ते जून या काळात पळून गेलेल्या १४३ मुला- मुलींपैकी अद्यापही ५८ मुला, मुलींचा शोध सुरू आहे. यात ५६ मुली तर दोन मुलांचा समावेश आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील मुला- मुलींचाही समावेश मुली, महिला पळून जाण्याचे प्रमाण शहरी भागात सर्वाधिक आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील मुला- प्रमाणात वाढत असल्याचे वास्तव समोर येत आहे.

अल्पवयीन मुले-मुली घर सोडण्याचे प्रमाण वाढत आहे. यात मुलींची संख्या तर अधिकच असते. त्यांना पालकांपेक्षा प्रियकर महत्त्वाचा वाटतो. आई-वडिलांनी घरात संवाद वाढविला पाहिजे, मुला- मुलींना वेळ दिला पाहिजे. संवेदनशील विषयांवर खुलेपणाने बोलले, तर असे प्रकार टळतील. मुलांना त्यांच्या चुकीची वेळीच जाणीव करून देणे महत्त्वाचे आहे. - सुनंदा पाटील, सहायक पोलिस निरीक्षक, एएचटीयू विभाग

Web Title: Children leave home at a young age due to love affairs; Know the numbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.