राष्ट्र सेवा दलाची मुले करणार दुष्काळाशी सामना

By admin | Published: May 13, 2017 02:16 AM2017-05-13T02:16:27+5:302017-05-13T02:16:27+5:30

राष्ट्र सेवा दलाने महाराष्ट्रात साने गुरुजी पथकाच्या माध्यमातून श्रमसंस्काराची संस्कृती रुजविली. त्यातून महात्मा गांधींच्या स्वप्नातील आदर्श गाव

Children of the National Service Team will face a drought | राष्ट्र सेवा दलाची मुले करणार दुष्काळाशी सामना

राष्ट्र सेवा दलाची मुले करणार दुष्काळाशी सामना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्र सेवा दलाने महाराष्ट्रात साने गुरुजी पथकाच्या माध्यमातून श्रमसंस्काराची संस्कृती रुजविली. त्यातून महात्मा गांधींच्या स्वप्नातील आदर्श गाव, स्वावलंबी गाव उभे करण्याची धडपड होती. सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे गावे उजाड आणि टंचाईने ग्रस्त होत आहेत़ ही गरज ओळखून या वर्षी २0 आणि २१ मे रोजी सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरजवळच्या पवारवाडी या गावात साने गुरुजींची राष्ट्र सेवा दलातील धडपडणारी मुले, कार्यकर्ते श्रमछावणी भरवून श्रमदान करणार आहेत.
पाणी फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील १३00 गावांमध्ये पाणी अडवा, पाणी जिरवा या मोहिमेंतर्गत दुष्काळावर मात करण्याच्या उद्देशाने लोक सहभागातला एक उपक्र म सुरू आहे. अभिनेता आमीर खान यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. याकरिता ‘सत्यमेव जयते वॉटर कप २0१७’ ही स्पर्धा सुरू आहे. गावातील आणि शहरातील लोकांनी एकत्र येऊन एकमेकांच्या सहकार्याने दुष्काळाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
सेवा दलाच्या श्रमसंस्कार चळवळीला अभिनेता आमीर खान यांनी पाणी फाउंडेशनमार्फत ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा’ सुरू करून एक प्रकारे साद दिली आहे. त्याच पद्धतीने सेवा दलाचे कार्यकर्ते दोन दिवस पवारवाडीत जलसंधारण आणि दुष्काळावर मात करण्यासाठी सुरू असलेल्या गावकऱ्यांच्या या प्रयत्नांमध्ये सहभागी होऊन श्रमदान करतील, गावातील लोकांशी संवाद साधतील, अशी माहिती या शिबिराचे समन्वयक आणि राष्ट्र सेवा दलाचे मुंबईचे कार्याध्यक्ष शरद कदम यांनी दिली.
राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अल्लाउद्दीन शेख यांच्या नेतृत्वाखाली श्रमछावणीला जाणाऱ्या या पथकात श्रमदानासोबत गावामध्ये दोन दिवस विविध कार्यक्र मांचे आयोजन केले आहे.
सकाळी ७ ते ११ पर्यंत पवारवाडी या गावामध्ये गावकऱ्यांसोबत श्रमदान आणि संध्याकाळी गावामध्ये लोकांशी संवाद असा भरगच्च कार्यक्र म आहे. राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अभिजित वैद्य, अंनिसचे हमीद दाभोलकर, अनिल सूर्यवंशी आणि अनेक मान्यवर यात सहभागी होणार आहेत़

Web Title: Children of the National Service Team will face a drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.