मुलांनी केले आईचे अवयवदान, तिघांना मिळाले जीवनदान!

By admin | Published: July 24, 2016 05:21 AM2016-07-24T05:21:39+5:302016-07-24T05:21:39+5:30

दोन दिवस सुरू असलेली डोकेदुखी असह्य झाल्याने बुधवारी एक महिला रुग्णालयात दाखल झाली. तपासण्या करत असतानाच त्या महिलेला ब्रेनहॅमरेज झाल्याचे निदान झाले.

Children's mother's organ donation, got three lifetimes! | मुलांनी केले आईचे अवयवदान, तिघांना मिळाले जीवनदान!

मुलांनी केले आईचे अवयवदान, तिघांना मिळाले जीवनदान!

Next

मुंबई: दोन दिवस सुरू असलेली डोकेदुखी असह्य झाल्याने बुधवारी एक महिला रुग्णालयात दाखल झाली. तपासण्या करत असतानाच त्या महिलेला ब्रेनहॅमरेज झाल्याचे निदान झाले. ब्रेन हॅमरेजमुळे एका दिवसात या महिलेचा मेंदू मृतावस्थेत गेला. त्यानंतर, तिच्या वैभव (वय १६) आणि रवी संघवी (वय १४) लहान मुलांनी आईचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. या महिलेची मूत्रपिंड, यकृत, त्वचा आणि डोळे दान करण्यात आले.
दादर परिसरात राहणारी ही महिला स्वयंपाकाची कामे करत होती. पतीच्या निधनानंतर दोन्ही मुलांचा सांभाळ महिला एकटीच करत होती. १९ जुलैपासून या महिलेचे डोके दुखत होते. त्यामुळे ती डॉक्टरांकडे गेली. त्या वेळी तिचा रक्तदाब वाढल्याचे निदान झाले. त्यानुसार, डॉक्टरांनी तिला गोळ््या दिल्या, पण डोकेदुखी थांबत नसल्याने दादरचे हिंदुजा रुग्णालय गाठले. त्या वेळी तिची दोन्ही मुले तिच्याबरोबर होती. ‘आमच्या आईला बर करा,’ असेही त्यांनी या वेळी डॉक्टरांना सांगितले असल्याची माहिती रुग्णालयाच्या प्रत्यारोपण समन्वयक डॉ. सुचेता देसाई यांनी दिली.
२२ जुलै रोजी उपचारादरम्यान या महिलेला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. या वेळी तिचा दीर आणि भाऊ रुग्णालयात होते. मुलांनी परवानगी दिली तर अवयवदान करू, असे दोघांनीही सांगितले. त्यामुळे मुलांकडे अवयवदानाची विचारणा केली असता, त्यांनी तत्काळ होकार दिला. ‘आम्ही लहान आहोत, म्हणून सही करूशकत नाही, पण आमच्या आईच्या अवयवामुळे दुसऱ्यांचा जीव वाचला, तर आम्हाला आनंद होईल, असे त्यांनी सांगितले. रुग्णालयातर्फे दात्याचे नातेवाईक मुलांशी बोलून हा निर्णय घेण्यात आला. या महिलेचे हृदय दान करण्याची तयारी दाखविली होती. पण, त्यावेळी हृदयदान होऊ शकले नसल्याचे डॉ. देसाई यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

पालिका रुग्णालयात ५ जणांचे अवयवदान
- जनजागृतीमुळे मेंदू मृतावस्थेत असणाऱ्यांचा अवयवदानाचा टक्का वाढलेला आहे. तथापि, खासगी रुग्णालयात अवयवदानाचे प्रमाण अधिक आहे. गेल्या सात महिन्यांत महापालिकेच्या प्रमुख तीन रुग्णालयातून ५ जणांनी अवयव दान केले आहे.
- १६ जुलैला केईएम रुग्णालयातील एक ५६ वर्षीय पुरुष मेंदू मृतावस्थेत असल्याचे निदान झाले. त्याचा अपघात झाला होता. या पुरुषाचे यकृत दान करण्यात आले. या पुरुषाचे यकृत केईएममधील रुग्णाला देण्यात आल्याची माहिती प्रमुख रुग्णालये संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.

Web Title: Children's mother's organ donation, got three lifetimes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.