लैंगिक अत्याचाराने बालिकेचा मृत्यू, शेजारच्या तरुणाचे कृत्य

By admin | Published: September 5, 2015 12:56 AM2015-09-05T00:56:02+5:302015-09-05T00:56:02+5:30

घराशेजारी राहणाऱ्या एका दहा वर्षीय बालिकेवर तरुणाने केलेल्या अत्याचारात तिचा मृत्यू झाल्याची घटना महागाव तालुक्यातील पोखरी येथे गुरुवारी घडली. पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली आहे

The child's death by sexual abuse, the activity of the neighboring youth | लैंगिक अत्याचाराने बालिकेचा मृत्यू, शेजारच्या तरुणाचे कृत्य

लैंगिक अत्याचाराने बालिकेचा मृत्यू, शेजारच्या तरुणाचे कृत्य

Next

महागाव (यवतमाळ) : घराशेजारी राहणाऱ्या एका दहा वर्षीय बालिकेवर तरुणाने केलेल्या अत्याचारात तिचा मृत्यू झाल्याची घटना महागाव तालुक्यातील पोखरी येथे गुरुवारी घडली. पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली आहे.
अंकुश बेले (२०) असे आरोपीचे नाव असून, त्याने घराशेजारी राहणाऱ्या बालिकेवर सकाळी शेतात पाशवी अत्याचार केला. या प्रकारानंतर बालिकेने घरी येऊन घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मात्र, तोपर्यंत बालिकेला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. तिला तत्काळ पुसदच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र दुपारी ४ वाजताच्या सुमारास तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The child's death by sexual abuse, the activity of the neighboring youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.