बालकांचा ‘ लठ्ठपणा’ चिंतेचा

By Admin | Published: August 30, 2014 10:56 PM2014-08-30T22:56:32+5:302014-08-30T22:56:32+5:30

बालकांमध्ये वाढत असलेला ‘लठ्ठपणा’ (स्थूलता) एक सामाजिक समस्या ठरत आहे.

Child's 'obesity' concern | बालकांचा ‘ लठ्ठपणा’ चिंतेचा

बालकांचा ‘ लठ्ठपणा’ चिंतेचा

googlenewsNext
सुरेश लोखंडे - ठाणो
बालकांमध्ये वाढत असलेला ‘लठ्ठपणा’ (स्थूलता)  एक सामाजिक समस्या ठरत आहे. यामुळे शालेय जीवनापासूनच या बालकांना शारीरिक व सामाजिक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. या समस्येला बाल्यावस्थेतच संपवण्यासाठी बालकांना  सकस पोषण आहार देण्याची गरज निर्माण झाली आहे. 
मुले जाड असल्यामुळे त्यांना इतर मुले चिडवतात. त्यामुळे ते घाबरून घरातच बसतात. तासन्तास एकांतात बसून खेळत राहिल्यामुळेदेखील मुलांमध्ये लठ्ठपणा वाढीला लागतो. याशिवाय खाण्यापिण्याच्या अयोग्य निवडीमुळे लहान वयातच मुलांचा बांधा अवाढव्य होतो. पौगंडावस्थेतही तो तसाच राहतो. मुले वयात आल्यानंतरही ही स्थूलता कायम राहिल्यामुळे सुमारे 2क्-25 वर्षे वयोगटातील मुलांना डायबीटिस, हायपरटेंशन, किडनी विकार आदींना सामोरे जावे लागते. या समस्येला संपविण्यासाठी बालकांच्या आहाराकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 
या जनजागृतीसाठी 1 सप्टेंबरपासून सुरू होणा:या ‘राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह’ कालावधीत  बालकांच्या आहाराकडे आई - वडिलांचे लक्ष केंद्रित  करणो हिताचे ठरणार आहे. 
खाण्यापिण्याच्या अयोग्य पद्धती व निवडीमुळे धावपळीच्या काळात फास्ट फूड  व तयार अन्नपदार्थ खाण्याकडे सर्वाचा जास्त कल आहे. याशिवाय व्यायामाचा अभाव असून विद्यार्थी तासन्तास अभ्यास, कॉम्प्युटर गेम, व्हिडीओ गेम आणि टीव्हीसमोर बसून राहिल्यामुळेदेखील मुलांमध्ये स्थूलता वाढत आहे. याशिवाय अनुवंशिकतेमुळेही मुले स्थूल होत आहेत.  स्थूलतेच्या या जाडपणामुळे  मित्र, मैत्रिणी चिडवत असल्यामुळे मुलांचा स्वाभिमान दुखावला जातो. यामुळे ते इतरांप्रमाणो मिळून-मिसळून राहत नाहीत. मुक्तपणो वावरण्याऐवजी ते घाबरून एकांतात, घरात राहणो पसंत करतात.  यामुळे  मुलांच्या मानसिकतेवर व व्यक्तिमत्त्वावर विपरीत परिणाम होताना दिसून येत असल्याचे ठाणो सिव्हिल रुग्णालयाच्या आहार तज्ज्ञ शीतल सत्यजीत नागरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. स्थूल असलेल्या मुलाचे वजन कमी करून ते नियंत्रित कसे ठेवायचे, आहार कसा द्यायचा, बालकांमधील सुदृढता कशी जोपासायची आदीसाठी ठाणो सिव्हिल रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गौरी राठोड यांच्या नियंत्रणात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त 1 ते 7 सप्टेंबरदरम्यान विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात मोठय़ा संख्येने सहभागी होण्यासाठी सिव्हिल रुग्णालयाच्या  माता-बालसंगोपन केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन आहारतज्ज्ञ शीतल नागरे यांनी केले आहे. 
 
यामुळे स्थूलता कमी करता येते 
लहान मुलांवर शिक्षकांचा प्रभाव  मोठय़ा प्रमाणावर होतो. यामुळे शैक्षणिक विकासाकडे लक्ष देत असतानाच शिक्षकांनी विद्याथ्र्याना आरोग्य शिक्षण, योग्य खाण्यापिण्याच्या सवयींची माहिती देणो योग्य ठरेल. शाळेत मैदानी खेळाचा एकतरी तास असायला हवा.
 
यामुळे विद्यार्थी मैदानी खेळाकडे वळतील. पालकांनी मुलांचे समुपदेशन करून मुलांना आहार व त्याचे महत्त्व पटवून देणो आवश्यक आहे. स्वत: खाण्यापिण्याच्या योग्य सवयी अंगी बाळगणो आवश्यक आहे. शरीर वाढीकरिता योग्य प्रमाणात पिष्टमय पदार्थ (काबरेदके) व प्रथिने यांचा आहारात समावेश करणो महत्त्चाचे आहे. मर्यादेत खाल्लेले पिष्टमय पदार्थ आपल्या हालचाली व योग्य वाढीकरिता उपयुक्त ठरतात. परंतु जी जास्त  पिष्टमय पदार्थ खाल्लेली असतात ती शरीरातील चरबीच्या स्वरूपात साठवली जातात. म्हणून योग्य प्रमाणातच पिष्टमय पदार्थ घेणो गरजेचे आहे.
 
च्मुलांना हिरव्या पालेभाज्या, फळे, मोड आलेले कडधान्य, दूध व दुधाचे पदार्थ, डाळी यांचा तृणधान्याबरोबर समावेश करून दिवसभराचा आहार ठरवावा. चॉकलेट, आइसक्रीम, चीज, बटर, पिङझा यांचा अति वापर टाळणो हिताचे. 
च्याशिवाय पालेभाज्या आधी निवडून स्वच्छ धुतल्यानंतर कापणो, पीठ न चाळता वापरणो, जास्तीतजास्त अख्खे धान्य वापरणो, मिक्स धान्याचा वापर करून मुगाची खिचडी, थालीपीठ आदी, तर इडली,  उतप्पा आदी आंबवलेल्या पदार्थाचा आहारात वापर, पॉलिश न केलेले धान्य वापरणो, भांडय़ावर झाकण ठेवूनच भाजा शिजवाव्या, पाककृतीमध्ये तिळाचा वापर करावा.
 
मुले जाड असल्यामुळे त्यांना इतर मुले चिडवतात. त्यामुळे ते घाबरून घरातच बसतात. तासन्तास एकांतात बसून खेळत राहिल्यामुळेदेखील मुलांमध्ये लठ्ठपणा वाढीला लागतो. 
खाण्यापिण्याच्या अयोग्य पद्धती व निवडीमुळे धावपळीच्या काळात फास्ट फूड व तयार अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे स्थूलपणा वाढतो.

 

Web Title: Child's 'obesity' concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.