आईच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने मुलाची आत्महत्या

By Admin | Published: August 11, 2016 06:41 PM2016-08-11T18:41:49+5:302016-08-11T18:41:49+5:30

आईच्या मॄत्यूचे दुःख सहन न झाल्याने मुलाने घरासमोरील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना पाटोदा तालुक्यातील बेन्सुर या गावी घडली .

Child's Suicide Because No Suffering Sufferable Mother's Death | आईच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने मुलाची आत्महत्या

आईच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने मुलाची आत्महत्या

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
बीड, दि.11 - आईच्या मॄत्यूचे दुःख सहन न झाल्याने मुलाने घरासमोरील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना पाटोदा तालुक्यातील बेन्सुर या गावी घडली .
       रामहरी यंका अडसुळ (50) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे . रामहरी मागील 25 वर्षांपासून जळगाव येथे हमालीचे काम करतात . ते कुटुंबासह तिकडेच स्थाईक झालेले आहेत . 4 ऑगस्ट रोजी त्यांची आई सीताबाई यांचे 75 व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले . 
    अंत्यसंस्कार व इतर क्रियाकर्म करण्यासाठी रामहरी गावी आलेले होते . आईच्या निधनाचे दुःख त्याना सहन झाले नाही बुधवारी रात्री त्यांनी घरासमोरील लींबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली . गुरुवारी हा प्रकार उघडकीस आला . रामहरी यांच्या पाठीमागे पत्नी एक विवाहित मुलगा , मुलगी आहे . या प्रकरणी पोलिसात अकस्मात मॄत्यूची नॊंद करण्यात आली असून जामदार शेख पाशा अधिक तपास करत आहेत . 

Web Title: Child's Suicide Because No Suffering Sufferable Mother's Death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.