चिकलठाणा विमानतळावर थरार

By Admin | Published: May 8, 2014 12:43 AM2014-05-08T00:43:26+5:302014-05-08T00:43:26+5:30

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी रात्री ७.३० वाजता मुंबईहून आलेल्या जेट एअरवेजच्या विमानाचे धक्कादायक लँडिंग शेकडो प्रवाशांना भयावह अनुभव देऊन गेले.

Chilthana Airport Thunder | चिकलठाणा विमानतळावर थरार

चिकलठाणा विमानतळावर थरार

googlenewsNext

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी रात्री ७.३० वाजता मुंबईहून आलेल्या जेट एअरवेजच्या विमानाचे धक्कादायक लँडिंग शेकडो प्रवाशांना भयावह अनुभव देऊन गेले. विमान उतरल्यानंतर पुन्हा हवेत उडून नागमोडी होत धावपट्टीवर गेले. विमान डाव्या बाजूने झुकल्यानंतर पुन्हा सरळ झाल्याचा अनुभव आतील प्रवाशांना आल्यामुळे अनेकांनी जीव मुठीत धरला होता. विमानातून बाहेर पडेपर्यंत अनेकजण धास्तावले होते. वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे विमान नियंत्रित झाल्याने मोठा अपघात टळला. काही क्षणांचा तो थरार भयावह होता. विमानातून बाहेर पडल्यानंतर प्रत्येकाने सुटकेचा नि:श्वास टाकला. राजकीय नेते, उद्योगपती आणि प्रशासकीय अधिकारी त्या विमानात होते. विमानात राज्यमंत्री सुरेश धस, आ. अब्दुल सत्तार, इंड्रीस हाऊजरचे अधिकारी, उद्योगपती नहार, डॉ. कानन येळीकर यांच्यासह उद्योगपती उल्हास गवळी, तसेच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, सहव्यवस्थापकीय संचालक व्ही. राधा, मुख्य दक्षता अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे आदी अधिकारी होते. धावपट्टीवरील थरारातून सुटल्यानंतर राज्यमंत्री धस आणि आ. सत्तार यांनी प्राधिकरणाचे अधिकारी आणि जेट एअरवेजच्या अधिकार्‍यांना चांगलेच सुनावले. या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी ते जेटच्या व्यवस्थापनाकडे गेले, तर उर्वरित प्रवाशांनी बालंबाल बचावलो असे म्हणत विमानतळ सोडले. च्जेट एअरवेजच्या प्रशासकीय सूत्रांनुसार तांत्रिक कारणांमुळे विमानाने ‘हार्ड लँडिंग’ केली, ज्यामुळे प्रवाशांना जोरदार धक्का बसला; पण विमानाने धावपट्टी सोडली नव्हती. च्वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. शिवाय नवीन प्रवासी असतात, त्यांना धक्का बसल्यासारखे वाटत असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. या प्रकाराबद्दल कुणीही तक्रार केली नसल्याचे जेटच्या अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. विमानाला ३ तास उशीर च्जेटचे ते विमान ३ तास अ‍ॅप्रनवर होते. त्या विमानाची परत जाण्याची वेळ ८.३० वाजेची होती. मात्र विमानात काही तांत्रिक बिघाड झाला आहे का याची चाचपणी करण्यासाठी ते अ‍ॅप्रन थांबविण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. तो अनुभव भयावह च्उद्योगपती उल्हास गवळी यांनी तो १५ सेकंदांचा क्षण लोकमतशी बोलताना व्यक्त केला. च्ते म्हणाले, विमान डाव्या बाजूने झुकल्याचे जाणवले. च्विमानाने धावपट्टी सोडली असती तर मोठा अपघातही झाला असता; मात्र पायलटच्या नियंत्रणामुळे व प्रवाशांच्या सुदैवाने तसे काहीही झाले नाही. च्मी अनेक वर्षांपासून विमानाने प्रवास करतो; मात्र आजच्या लँडिंगचा अनुभव भयावह होता.

Web Title: Chilthana Airport Thunder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.