चिमुरडीचे अपहरण करणा-यास अटक

By admin | Published: August 26, 2015 12:46 AM2015-08-26T00:46:35+5:302015-08-26T00:46:35+5:30

सोलापूर व दे.राजा पोलिसांनी केले ‘मिशन मुस्कान’ फत्ते !

Chimudadi kidnapping stabbed | चिमुरडीचे अपहरण करणा-यास अटक

चिमुरडीचे अपहरण करणा-यास अटक

Next

देऊळगावराजा (जि. बुलडाणा) : दोन महिन्यापूर्वी आठ वर्षीय चिमुरडीचे अपहरण केलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. सोलापूर व देऊळगाव राजा पोलिसांनी संयुक्तपणे ह्यऑपरेशन मुस्कानह्ण मोहीम फत्ते करुन दोन दुरावलेल्या मायलेकींची भेट करुन दिली. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील अशोक ङ्म्रीराम पवार (३५ वर्ष) याने गावातील कोमल (काल्पनिक नाव) या आठ वर्षीय मुलीचे आठवडी बाजारातून अपहरण केले होते. याबाबत सदर मुलीच्या आईने ३0 जून २0१५ रोजी मोहोळ पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. यासंदर्भात पोलिसांनी आरोपीविरूध्द अप.नं.२५२/१५ कलम ३६३, ३६६ (अ) भादवि प्रमाणे गुन्हा नोंदवून तपासचक्र वेगाने फिरवली. याबाबत सोलापूरचे पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांनी मिशन मुस्कानच्या माध्यमातून मोहोळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुरज बंडगर यांना तपास करण्याचे आदेश दिले. सदर तपास सपोनि डी.एस.ढोणे यांचेकडे देण्यात आला. तपासादरम्यान सोलापूर पोलिसांनी तपासाला अधिक गती देत सदर आरोपीचे स्केच (रेखाचित्र) तयार करून विविध पोलिस स्टेशनला पाठविले. हे रेखाचित्र देऊळगावराजा पोलिसांकडे माहितीसाठी आल्यानंतर त्यादृष्टीने तपास सुरू केला. दरम्यान २४ ऑगस्ट रोजी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सदर मुलगी देऊळगावराजात असल्याचे समजल्यावर ठाणेदार अंबादास हिवाळे यांनी सदर आरोपी व मुलीस ताब्यात घेतले. हा आरोपी या मुलीसोबत बसस्थानक परिसरात पाल उभारून राहत होता व या मुलीला भीक मागायला लावत होता. आरोपीला ताब्यात घेतल्यावर पोलीसांनी याबाबत मोहोळ पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार सोलापूर येथून पोहेकाँ बाळासाहेब माने, महिला पोलिस हकीम बानो शेख यांनी दे.राजा येथे सदर मुलीच्या आईला सोबत घेवून मंगळवारी सकाळी देऊळगावराजा गाठले. मुलीला सुखरूप पाहून आईच्या डोळयातुन अङ्म्रुंच्या धारा वाहू लागल्या. तब्बल दोन महिन्यानंतर माय लेकरांची भेट घडवून दिली. सदर मुलीला पळवून आणण्याचा आरोपीचा उद्देश सद्यातरी स्पष्ट झाला नसल्याचे पोलीसांनी सांगितले.

Web Title: Chimudadi kidnapping stabbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.