नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडा ठार तर महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 05:55 PM2017-10-22T17:55:59+5:302017-10-22T19:24:16+5:30

संध्याकाळी सिन्नर जवळील मोहदरी घाटात नाशिक-पुणे महामार्गावर एका भरधाव अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणार्‍या बिबट्याला जोरदार धडक दिली. ताहराबाद वनक्षेत्रातील तळवाडे-भामेर परिसर हा जंगलांनी वेढलेला असून या भागात मेंढपाळ नेहमी मुक्कामी असतात. एका मेंढपाळाच्या पडाव असलेल्या राहूटीमधून वडीलांजवळ झोपलेल्या कोमल नामदेव नामदास या अडीच वर्षाच्या मुलाला बिबट्याने उचलून फरफटत जंगलात नेले.

Chimudra killed in Leopard attack in Nashik | नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडा ठार तर महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडा ठार तर महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

Next
ठळक मुद्देताहराबाद वनक्षेत्रातील तळवाडे-भामेर परिसर हा जंगलांनी वेढलेला वडीलांजवळ झोपलेल्या कोमल नामदेव नामदास या अडीच वर्षाच्या मुलाला बिबट्याने उचलून फरफटत जंगलात नेले. मेंढपाळ कुटुंबियांना शासकिय नियमानुसार आर्थिक मदत दिली जाणार आहे.

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील भामेर शिवारात शनिवारी (दि.२१) संध्याकाळी एका चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून जंगलात नेल्याची घटना घडली. रात्रभर गावकरी सर्वत्र मुलाचा शोध घेत होते. सकाळच्या सुमारास परिसरातील एका जंगलात मुलाचे शीर आढळून आल्याने संताप व्यक्त होत आहे.
ताहराबाद वनक्षेत्रातील तळवाडे-भामेर परिसर हा जंगलांनी वेढलेला असून या भागात मेंढपाळ नेहमी मुक्कामी असतात. एका मेंढपाळाच्या पडाव असलेल्या राहूटीमधून वडीलांजवळ झोपलेल्या कोमल नामदेव नामदास या अडीच वर्षाच्या मुलाला बिबट्याने उचलून फरफटत जंगलात नेले. यानंतर गावातील नागरिकांनी रात्रभर सर्वत्र शोध घेतला; मात्र मुलगा आढळून आला नाही. दरम्यान, सकाळी काही लोक जंगलात शोधण्यासाठी गेले असता त्यांना मुलाचे शीर मिळून आले. घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. यानंतर घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल झाले. या भागात तत्काळ पिंजरे लावण्यात येणार असून मेंढपाळ कुटुंबियांना शासकिय नियमानुसार आर्थिक मदत दिली जाणार आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा नाशिक-पुणे महामार्गावर मृत्यू 
तसेच दुसर्‍या घटनेत संध्याकाळी सिन्नर जवळील मोहदरी घाटात नाशिक-पुणे महामार्गावर एका भरधाव अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणार्‍या बिबट्याला जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. सुमारे साडेतीन वर्षांचा नर जातीचा बिबट्या या अपघातात मृत पावला. यावेळी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वनविभागाचे अधिकार्‍यानी तातडीने घटनास्थळ गाठले. वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके, वनपाल अनिल साळवे, प्रितेश सरोदे, पोपट बिन्नर आदिंनी स्पॉट पंचनामा केला. आज सकाळी पशुवैद्यकिय अधिकाºयांनी शवविच्छेदन करून वनविभागाच्या कर्मचार्‍यानी मोहदरी वनोद्यानात मृत बिबट्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


निफाडला बिबट्या जेरबंद
निफाड तालुक्यातील शिवरे गावात धुमाकूळ घालणार्‍या नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडा ठार तर महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे. शिवरे गावातील बाजीराव सानप यांच्या शेतात लावलेल्या पिंजºयात पाच वर्षांचा नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला. सदर माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनपाल प्रसाद पाटील, वनरक्षक व्ही. आर. टेकनर, दत्तू आहेर आदिंनी पिंजरा ताब्यात घेतला. सुरक्षितरित्या पिंजरा निफाड रोपवाटिकेत हलविण्यात आला.

Web Title: Chimudra killed in Leopard attack in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.