चुकांमुळे चीन, पाकची डोकेदुखी

By admin | Published: April 7, 2017 12:57 AM2017-04-07T00:57:38+5:302017-04-07T00:57:38+5:30

नेपाळ, तिबेट, कोकोस आयलंड, ग्वादरचा प्रदेश हे भारताच्या अधिपत्याखाली येऊ पाहणारे प्रदेश तत्कालीन सरकारने नाकारले.

China, Pakistani headache due to mistakes | चुकांमुळे चीन, पाकची डोकेदुखी

चुकांमुळे चीन, पाकची डोकेदुखी

Next

पुणे : नेपाळ, तिबेट, कोकोस आयलंड, ग्वादरचा प्रदेश हे भारताच्या अधिपत्याखाली येऊ पाहणारे प्रदेश तत्कालीन सरकारने नाकारले. त्यामुळेच आज चीन आणि पाकिस्तान भारताच्या सुरक्षेमध्ये बाधा निर्माण करत आहे, असे मत ज्येष्ठ संरक्षणतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास सोहनी यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या विजय खरे लिखित सहा पुस्तकांचे प्रकाशन गुरुवारी एस. एम. जोशी सभागृहात झाले. त्या वेळी
डॉ. सोहनी बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू
डॉ. वासुदेव गाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दलित साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक
डॉ. रावसाहेब कसबे, सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू सुधीर गव्हाणे, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, परशुराम वाडेकर, डॉ. विजय खरे आदी उपस्थित होते.
सोहनी म्हणाले, ‘‘भारताच्या स्वातंत्र्यानंतर परराष्ट्रधोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण धोरणांविषयी घेतलेल्या चुकीच्या धोरणांमुळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत राजीनामा दिला होता. त्याच धोरणांमुळे आज चीन, पाकिस्तानसारख्या गंभीर समस्या उभ्या राहिल्या आहेत. डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटना तयार केली, कारण ते उत्तम प्रशासक होते. केवळ न्याय व्यवस्थेसंदर्भात त्यांचा अभ्यास नव्हता तर परराष्ट्र धोरण, अंतर्गत सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेतील धोरणांचे ते गाढे अभ्यासक होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात जी नीती अवलंबली होती, तशी नीती राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात वापरायला हवी हा त्यांचा आग्रह होता. (प्रतिनिधी)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विकसित भारत हवा होता. देशात सामाजिक आणि आर्थिक समता असावी, असा त्यांचा आग्रह होता. देशाच्या विकासामध्ये प्रत्येक व्यक्तीने सहभागी व्हावे, अशी त्यांची धारणा होती. साहित्याच्या माध्यमातून
डॉ. आंबेडकरांचे अनेक पैलू समोर आले आहेत. मात्र, त्यांचे काही महत्त्वाचे पैलू जनतेसमोर येण्याची गरज आहे, त्यावर अद्याप लिखाण झालेले नाही. - डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
भूषण गोखले म्हणाले, समाजातील आर्थिक विषमता वाढल्याने कमकुवतपणा देशाला येऊ शकतो. बाबासाहेबांच्या संरक्षणात्मक विचारांचा वापर हा देशाच्या राष्ट्रीय संरक्षणासाठी करणे गरजेचे आहे.

Web Title: China, Pakistani headache due to mistakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.